शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

रामदेवबाबांचा नागपुरात ‘उद्योग योग’

By admin | Updated: August 10, 2016 04:48 IST

योगगुरु बाबा रामदेव यांच्या उद्योग विश्वाची महाराष्ट्रातील मुहूर्तमेढ नागपुरात रोवली जाणार असून तेथील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पात

मुंबई : योगगुरु बाबा रामदेव यांच्या उद्योग विश्वाची महाराष्ट्रातील मुहूर्तमेढ नागपुरात रोवली जाणार असून तेथील महत्त्वाकांक्षी मिहान प्रकल्पात त्यांच्या कृषी-वन उत्पादनांच्या उद्योगासाठी २२५ एकर जागा देण्यात येणार आहे. या संदर्भात लवकरच अंतिम निर्णय होणार आहे. नागपुरात वन-कृषी क्षेत्रावर आधारित उत्पादनांच्या निर्मितीसाठी पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षी केली होती. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाने त्यासाठी तयारी दर्शविली. या प्रकल्पासाठी चारवेळा निविदा काढण्यात आली. चवथ्या निविदेत पतंजली समूहाची एकट्याचीच निविदा आल्याने नियमानुसार आता त्यांना हे काम देण्याचा निर्णय घेतला जाईल. सर्व नियम तपासूनच आम्ही या बाबतचा निर्णय घेऊ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी विदर्भातील शेतकऱ्यांकडून दरवर्षी किमान १०० कोटी रुपये किमतीची कृषी आणि वन उत्पादने पतंजलीकडून खरेदी करण्यात येणार आहेत. कमीतकमी एक हजार जणांना रोजगार दिला जाईल. त्या सोबतीने पॅकेजिंग उद्योग, वाहतूक व्यवसायाला गती मिळणार आहे. आत्महत्याग्रस्त विदर्भाला या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळेल. या प्रकल्पासाठी मिहानमधील बिगर एईझेड क्षेत्रातील २२५ एकर जागा देण्यात येणार आहे. त्यासाठीची शासनाने निश्चित केलेली रक्कम पतंजली समूहाला भरावी लागणार आहे. बाबा रामदेव यांचे उद्योग विश्व अत्यंत झपाट्याने वाढत आहे. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती असल्याने येथे मोठे उद्योग विश्व उभारण्याचा पतंजली समूहाचा विचार आहे. त्याची मुहूर्तमेढ म्हणून या प्रकल्पाकडे बघितले जात आहे. (विशेष प्रतिनिधी)