शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

रामदास कदम - शेट्टी यांच्यात तू तू मैं मैं

By admin | Updated: September 25, 2014 09:19 IST

महायुतीच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांच्यात अक्षरश: तू तू मैं मैं झाल्याचे वृत्त आहे.

संदीप प्रधान, मुंबईमहायुतीच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व शिवसेना नेते आमदार रामदास कदम यांच्यात अक्षरश: तू तू मैं मैं झाल्याचे वृत्त आहे.वांद्रे-कुर्ला संकुलातील एका हॉटेलात सेनेचे नेते दिवाकर रावते, रामदास कदम, अनिल देसाई व संजय राऊत हे नियोजित वेळी पोहोचले. मात्र भाजपाच्या किंवा मित्रपक्षांच्या नेत्यांचा पत्ता नव्हता. अर्ध्या तासानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे दाखल झाले. त्यानंतर जवळपास पाऊण तासानंतर ओम माथूर बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. यामुळे अगोदरच शिवसेना नेते अस्वस्थ झाले होते. सध्या शिवसेना व भाजपा नेत्यांमध्ये एकमेकांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याची अहमहमिका लागलेली आहे.बैठक सुरू होताच केवळ सात जागा मिळत असल्याने स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांच्या संतापाचा कडेलोट झाला. तुम्ही आम्हाला काय भिकारी समजता का? आम्ही तुमच्याकडे कटोरा घेऊन आलो नाही. दोन महिने आपली चर्चा सुरू आहे ती केवळ सात जागा देऊ करण्याकरिता का? शेट्टी यांचा आवाज चढल्याने शिवसेनेच्या रामदास कदम यांचे पित्त खवळले. तोंड संभाळून बोला. इतके टोकाचे बोलायचे असेल तर चर्चा कशाला करायची? तुमची भाषा बरोबर नाही, अशा शब्दांत कदम यांनी शेट्टींचा समाचार घेतला. लागलीच शेट्टी उठले आणि तरातरा लिफ्टकडे निघाले. त्यांच्यापाठोपाठ विनोद तावडे व आशिष शेलार धावत गेले. त्यांनी त्यांना विनंती करून हाताला धरून परत आणले. लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना तुम्ही चार जागा दिल्या. त्या तर्कशास्त्रानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सहा यानुसार किमान २४ विधानसभा मतदारसंघ सोडण्याची मागणी बैठकीत केली गेली. रिपाइंचे रामदास आठवले हे भोजनाला न थांबताच निघून गेले.