शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले, मेटेंना संधी कमीच

By admin | Updated: June 28, 2016 04:45 IST

मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात खा.रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा समावेश होण्याची शक्यता दिसत नाही

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात खा.रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा समावेश होण्याची शक्यता दिसत नाही. मंत्रिमंडळ विस्तारात रासपचे आ.महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आ.सदाभाऊ खोत यांनाही स्थान मिळणार नव्हते, मात्र भाजपा श्रेष्ठींनी त्यांच्या नावाला अनुकूलता दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या चारही मित्रपक्षांना सामावून घेण्याबाबत भाजपामध्ये सुरुवातीला दिल्ली व मुंबईतील नेत्यांमध्ये मतभिन्नता होती. तथापि, आता जानकर आणि खोत यांना संधी देण्यावर जवळपास एकमत झाल्याचे समजते. शिवसंग्रामचे मेटे यांना छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्षपद देण्यात आले असून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जादेखील आहे. छत्रपती संभाजी राजे यांना राज्यसभेवर पाठवून मराठा समाजात आपला पाया अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. अशावेळी मेटेंना मंत्रीपद देऊन मित्रपक्षातील मराठा नेतृत्वाला मोठे करण्यास भाजपा उत्सुक नाही. आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल. मात्र, त्यांच्या पक्षाला राज्यात मंत्रीपद मिळणार नाही. त्या ऐवजी त्यांच्या पक्षाला दोन महत्त्वाच्या महामंडळाचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे.आ.जानकर यांना पर्याय म्हणून नागपूरचे डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले आहे. मात्र, जानकर यांचे नेतृत्व झाकाळून महात्मे हे धनगर समाजात त्यांची जागा घेण्याची शक्यता नाही. शिवाय, आजच्या परिस्थितीत जानकर यांना डावलणे भाजपाला परवडणारे नाही. समाजात आजही त्यांचे स्थान आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद दिले पाहिजे, असा भाजपामध्येही सूर असल्याचे एका ज्येष्ठ मंत्र्याने लोकमतला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला दोन मंत्रिपदे दिली जातील. मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांना अद्याप ही नावे देण्यात आलेली नाहीत. गुलाबराव पाटील, अर्जून खोतकर, विजय औटी आणि डॉ.नीलम गोऱ्हे हे चार प्रमुख दावेदार आहेत. गोऱ्हे वगळता इतर तिघे विधानसभेचे सदस्य आहेत.