शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रमदान तू मेहमान है, चला जाएगा...

By admin | Updated: June 25, 2017 03:55 IST

रमजान ईदची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यंदा उन्हाळ््याच्या सुट्टीतच रमजान आल्याने महिना कधी सुरू झाला आणि कधी सरला ते अनेकांना कळले नाही.

- नेहा नाईकरमजान ईदची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यंदा उन्हाळ््याच्या सुट्टीतच रमजान आल्याने महिना कधी सुरू झाला आणि कधी सरला ते अनेकांना कळले नाही. सेहरीपासून रोजे सोडण्यापर्यंतची तयारी, खरेदी, नातलग-मित्रमंडळींच्या गाठीभेटी यामुळे हा अख्खा महिना धामधुमीत जातो आणि मग दीर्घकाळ उरतात त्याच्या आठवणी. त्यातील काही आठवणींना उजाळा...मीमुंब्य्रात जेथे राहते तिथला रमजानचा माहोल प्रत्येक घरात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक परिसरात जाणवत राहतो. दिवाळीनिमित्त हिंदू कुटुंबात जशी आधीपासून तयारी सुरू होते, तशीच तयारी आमच्याकडेही रमजाननिमित्त असते. त्याची चमकधमक, बाजारात जाऊन तासनतास केलेली खरेदी... सेहरीसाठी आधी केलेली तयारी, सकाळी लवकर उठणे, रोजे सोडण्यासाठी केले जाणारे पदार्थ... मालपुवा, फिरनी, रबडी अशा खास रमजानच्या काळातील खाद्यपदार्थांची रेलचेल. ते खिलवणे... सारे यादगार असते. यातील काही पदार्थ इतरवेळी मिळतीलही, पण या काळात त्यांची जी चव असते, ती अवर्णनीय.या काळात प्रत्येक घरात उत्साह संचारलेला असतो. सेहरीसाठी लवकर उठण्याची लगबग असते. वेळेत उठायला जमेल ना? सगळी तयारी वेळेत होईल ना? याची धाकधूक असते. केवळ श्रीमंत कुटुंबातच नव्हे, तर अगदी साध्या कुटुंबातसुद्धा सेहरीसाठीही पाच-सहा पदार्थ असतातच. शेवटशेवटचा अशरा जसा जवळ येतो तशी बाजारातील गर्दी पण वाढत जाते. मध्यरात्री दोन दोन वाजेपर्यंत मार्केट गर्दीने भरलेली असतात. या काळात भाज्या, फळे, सुकामेवा, दूध सगळे महाग मिळते. पण त्या अर्थाने तो बरकती महिना असतो. प्रत्येकजण थोडा जास्तच खर्च करण्याच्या मूडमध्ये असतो. महम्मदअली रोडला तर मी खाऊगल्लीच म्हणेन. तिथल्या खाण्याच्या पदार्थांचे किती वर्णन करावे? मांसाहारी पदार्थ, मिठाया यांची व्हरायटी पाहूनच थक्क व्हायला होते. त्या वातावरणालाही ग्लॅमर असते. त्यामुळे सेलेब्रिटीही तिथे गर्दी करतात. मग सुरू होते, कपडे, दागिने, चपला, पर्स अशी खरेदी... या काळात व्हरायटी भरपूर असते. पण इतरवेळेपेक्षा कपडेही थोडे महागच मिळतात. घराघरात पाहुणे आलेले असतात. नातलग, शेजारपाजारचे, मित्रमंडळी यांनी घरे भरून गेलेली असतात. लाहन मुलांची तर मजाच असते. त्यांना मिळालेली ईदी कशी खर्च करायची याचे त्यांचे प्लॅन ठरतात. कुणी खेळणी घेतात, तर कुणी गेम. कुणाला कपडे हवे असतात, तर कुणाला वस्तू. जत्रा भरतात. त्यात हुंदडायचे असते. छोट्या मुलांना खास सजवले जाते. त्यांच्या कपड्यांपासून सारी खरेदी हा वेगळाच आनंद देते. शिवाय जी छोटी मुले पहिल्यांदा रोजे ठेवतात, त्यांचे भरपूर कौतुक होते. त्यांची रोजा खुलवाई हा स्वतंत्र सोहळाच असतो. ईद हा या महिन्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण. पण माझ्या दृष्टीने तो आनंदही देतो आणि दु:खद आठवणीही. माझ्या वडिलांचे ईदच्या दिवशीच निधन झाले होते. ते पुण्यवान ठरले, पण त्यांच्या आठवणीशिवाय आामची ईद पार पडत नाही...ईद म्हटली की शिरकुर्म्याशिवाय तिची कल्पनाच करता येत नाही. एरवी कधीही तशी खीर केली तरी तिला ती चव येत नाही. रमजानच्या पवित्र वातावरणाचा परिणाम असेल, पण त्या शिरकुर्म्याला जी चव येते तिचे वर्णन करता येत नाही. वरवर पाहयाला गेले तर ती खीर. पण ईदच्या दिवशी ती तयार करण्यासाठी भरपूर वेळ लागतो. एकतर भरपूर पाहुणे येणार असतात. त्यामुळे पहाटेपासूनच तिची तयारी सुरू होते. भरपूर दूध आणले जाते. साध्या साध्या घरातसुद्धा पाच-दहा लीटरची खीर केली जाते. त्यातला प्रत्येक पदार्थ, मग त्या शेवया असोत की सुकामेवा... सढळ हाताने घातला जातो. प्रत्येक स्त्रीला वाटत असते, माझ्याकडच्या शिरकुर्म्याची चव खाणाऱ्यांच्या लक्षात रहायला हवी. ती इतरांपेक्षा लज्जतदार व्हायला हवी. त्यासाठी तिची जिवापाड मेहनत सुरू असते. सोबतीला इतर पदार्थही असतातच.रमजानच्या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे जकातीचे. या काळात लोक खास करून ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनी तर समाजातील गरीबांना मदत करावी, असे अपेक्षित असते. त्यामुळे आर्थिक मदत करणे, रेशन देणे, कपडे देणे, औषधपाण्याचा-शिक्षणाचा खर्च देणे अशा अनेक मार्गांनी लोक मदत करतात. ज्या कुटुंबाला मदत करायची त्यांची गरज, अपेक्षाही समजून घेतली जाते. पण रमजानच्या काळात आपल्यासोबत गरीबांच्या घरातही ईद आनंदाने साजरी व्हावी, ही अपेक्षा असते. त्यामुळे घरात गरजेच्या वस्तू, अन्नधान्य, कपड्यातील प्रत्येक वस्तू देण्यावर जास्त भर असतो. तसेही आमचे अनेक ग्रूप वर्षभर असे काम करत असतात. पण रमजानच्या काळात केल्या जाणाऱ्या मदतीला खूप महत्त्व असते. या काळात प्रत्येक घराचे वेळापत्रक बदललेले असते. कधीकधी तर मध्यरात्रीच उठायचे असते. पुन्हा रोजे सोडण्याची तयारी, भरपूर खरेदी. फिरणे यात दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो तेही कळत नाही. त्यातही सतत भेटणारी माणसे. नातलग यामुळे सारा काळ आनंदात कधी सरतो तेच कळत नाही. नंतर मात्र खूप दिवस रमजानच्या आठवणी पुरतात. काही तरी चुकल्याचुकल्यासारखे होते. हा काळ कधी सरू नये, असे वाटत राहते. पण रमजान सरतो, पुन्हा पुढच्यावर्षीची ओढ लावत...- शब्दांकन : मिलिंद बेल्हे