शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रमजानचा उत्साह शिगेला ! खाद्य संस्कृतीची विविधता

By admin | Updated: July 2, 2016 02:45 IST

मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजानचा सण जवळ येत आहे

चेतन कंठे,

मुंबई- मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजानचा सण जवळ येत आहे. त्यामुळे सध्या मोहम्मद अली रोड, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी येथील बाजारपेठा सध्या फुललेल्या आहेत. प्रसिद्ध मोहम्मद अली रोडवर तर काजू, बदाम, पिस्ता, मनुके आणि चारोळीच्या सुवासाने पूर्ण बाजार सध्या दरवळून निघालेला आहे. सध्या आकर्षक रोषणाईसह खाद्य पदार्थांची आणि थंडगार पेय, फळांच्या सजलेल्या दुकानांमुळे मुंबईकरांची पावले आपसूकच मोहम्मद अली रोडकडे वळत आहेत. लहान मुलांची खेळणी रस्त्यालगत गाड्यावर सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. या रोडवर येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य व नवनवीन खरेदीची उत्सुकता आणि खरेदीसाठीची लगबग मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे. घरोघरी बनवलेल्या खाद्य पदार्थांचे ताट शेजाऱ्यांना देण्याचीही रित आहे. लांबून येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार गोडधोड देऊन केला जातो. रमजान महिन्यात उपवास म्हणजे आत्म्याची शुध्दी मानली जाते. पहाटे ४:३० वाजता सुरु झालेला उपवास संध्याकाळी ७:१५ च्या सुमारास खजूर खाऊन व पाणी पिऊन सोडला जातो. संपूर्ण महिन्यांत पाचवेळा नमाज पठण केले जाते. नियमित प्रार्थना, पवित्र धर्मग्रंथाचे वाचन आणि गरिबांना अन्न, पैसे दान करणे, या काळात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रमजानसाठी मोहम्मद अली रोड, वांद्रे, कुर्ला, जोगेश्वरी या ठिकाणी विविध खाद्य पदार्थांना मागणी आहे. रमजानात स्पेशल पदार्थांमध्ये शेवया, मालपोवा, फिरनी, मिल्क बर्फी आणि रसमलाईला अधिक मागणी असल्याचे मिठाई विक्रेता मोहम्मद कुरेशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ईदच्या नमाज पठणासाठी पठाणी, कूर्ता-पायजमा आदींनाही सध्या बाजारात वाढती मागणी आहे. तसेच विविध फॅशनेबल कपडे शिवून घेण्यासाठीही लगबग दिसून येत आहे. >‘आलिंगन देऊन शुभेच्छांची रीत’रमजानचे रोजे बहुतांश मुस्लिम बांधव पाळतात. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत महिला, मुले, आजारी व्यक्तींना सूट असल्याचे धार्मिक नेते सांगतात. लहान मुले आणि प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी शक्य असेल तर इच्छेनुसार रोजा करावा, असेही सांगितले जाते. ईदला नवीन वस्त्र धारण करुन मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत जावून नमाज अदा करतात, एकमेकांना अलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा घेतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू सर्वांनाच शुभेच्छा देण्याची पारंपरिक पद्धत आहे.