शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

राममोहन इंग्लिश स्कूलमध्ये ‘ज्ञानमार्गिका’

By admin | Updated: August 1, 2016 02:17 IST

शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीच्या हेतूने एक नवा ‘मार्ग’ निर्माण करत नवा आदर्श निर्माण केले आहे.

राज चिंचणकर,

मुंबई- ज्या शाळेने सुजाण नागरिक घडवण्याचा मार्ग दाखवला; त्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकीच्या हेतूने एक नवा ‘मार्ग’ निर्माण करत नवा आदर्श निर्माण केले आहे. गिरगावची राममोहन इंग्लिश स्कूल ही शाळा १२ वर्षांपूर्वी बंद पडली. शाळा पुन्हा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून आता एक अनोखी सामाजिक बांधिलकी आकाराला आली आहे. त्याचा सदुपयोग थेट पाली येथील शैक्षणिक कायार्साठी करण्यात आला आहे.पाली येथील श्री बल्लाळ विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदिवासी शाळेच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम पूर्ण होऊनही त्याचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी होत नव्हता; कारण या इमारतीच्या मार्गिकेच्या बांधकामासाठी लागणारा निधी या संस्थेकडे उपलब्ध नव्हता. परिणामी, या मार्गिकेचे बांधकाम रखडले होते. ही बाब राममोहन इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांच्या लक्षात आली आणि या विद्यार्थ्यांनी अल्पावधीत तब्बल ४ लाख ५० हजार रुपये जमवून हा निधी या संस्थेकडे सुपूर्द केला.विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचे हे योगदान लक्षात घेऊन या संस्थेने या मार्गिकेचे नामकरण ‘राममोहन ज्ञानमार्गिका’ असे करत या विद्यार्थ्यांच्या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीला सलाम केला आहे. नेहा कुरंभट्टी, अनिता मोंडकर, रत्नेश जव्हेरी, किरण करलकर, शैलेश जाधव आदी विद्यार्थी शाळेचे प्रतिनिधी म्हणून या मार्गिकेच्या नामकरण प्रसंगी उपस्थित होते. आमची शाळा सध्या बंद असली, शाळेची ज्ञानपताका अशीच उत्तुंग फडकवत ठेवू आणि आमच्या शाळेची दारे पुन्हा एकदा ज्ञानार्जनासाठी खुली होतील, अशी भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.