शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
3
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
4
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
5
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
6
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
7
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
8
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
9
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
10
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
11
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
12
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
13
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
14
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
15
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
16
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
17
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
19
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
20
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

कृषी विभागाचा कारभार ‘राम भरोसे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 06:06 IST

शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या कृषी विभागात मात्र अधिकारी आणि कर्मचारीची वाणवा आहे.

अतुल कुलकर्णी,

मुंबई- कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी अशा नैसर्गिक दृष्टचक्रात अडकलेले शेतकरी, आत्महत्यांचे न संपणारे सत्र असे चित्र एकीकडे असताना , दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणाऱ्या कृषी विभागात मात्र अधिकारी आणि कर्मचारीची वाणवा आहे. आजमितीला अ, ब, क आणि ड या चार संवर्गातील मिळून तब्बल ७४११ जागा रिक्त आहेत. यातील तब्बल १५०८ जागा पदोन्नती अभावी रिक्त आहेत, तर निवृत झालेले आणि आजारी रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ८ हजाराहून अधिक जागा भरल्या गेलेल्या नाहीत.राज्यात कृषीसंचालकांच्या ५ जागा आहेत, त्यापैकी ४ जागा रिक्त आहेत. कृषी सहसंचालकांच्या १४ पैकी ५ जागा रिक्त आहेत. वरिष्ठ पदावरील खुर्च्या रिकाम्या असल्याने खालून वरपर्यंत येणाऱ्या फाईल किती गतीने हलत असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गट अ संवर्गातील २८, ब संवर्गातील ७९२ तर गट क संवर्गातील ४९९५ आणि ड संवर्गातील १५९६ जागा रिकाम्या आहेत. या ७४११ पैकी ५९०३ जागा सरळसेवेने भरवयाच्या आहेत. मात्र, त्यासाठी अद्याप भरती प्रक्रियाच सुरू झालेली नाही.शेतीच्या कामासाठी महत्वाची असणारी अधिक्षक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आरेखक, अनुरेखक, माळी अशी महत्वाची पदे देखील शेकडोंनी रिक्त आहेत. सरकारने एखाद्या कृषी योजनेचा आढावा घ्यायचे ठरवले किंवा शेतकऱ्यांपर्यंत नवीन योजना पोहोचविण्याचे ठरवले तरी देखील आज मितीला सरकारकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुनशेतकऱ्यांना ज्ञान देण्याची कोणतीही योजना आज सरकारजवळ नाही. परिणामी यावर्षी चांगला पाऊस होऊनही शेतकऱ्यांना ‘राम भरोसे’ सोडण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.