शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या राज्यात देशाची सुरक्षाव्यवस्था 'रामभरोसे' - उद्धव ठाकरे

By admin | Updated: November 2, 2016 07:47 IST

भोपाळमध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत सिमीचे आठ दहशतवादी मारले गेले. त्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - भोपाळमध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत सिमीचे आठ दहशतवादी मारले गेले. त्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. काँग्रेससह काही पक्षांनी या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवसेनेने या निमित्ताने चकमकीचे समर्थन करताना मित्रपक्ष भाजपाला लक्ष्य करण्याची संधी साधली आहे.  
 
जे मारले गेले ते सर्वच जण बॉम्ब बनविण्यात तरबेज होते. तुरुंग फोडून पळून जाण्यामागे त्यांचे भयंकर कारस्थान कशावरून नसेल? अशा शब्दात चकमकीचे समर्थन केले आहे. त्याचवेळी ‘सिमी’चे आठ अतिरेकी सेंट्रल जेलमधून पळून जातात हे सरकारसाठी लांच्छनास्पदच होते. 
 
राष्ट्रीय सुरक्षेचा हा खेळखंडोबाच आहे. त्याचे समर्थन कोणी करू नये. भारतीय जनता पक्षाचे राज्य येऊनही प्रभू श्रीरामांचा वनवास संपला नाही. अयोध्येत राममंदिर उभारणीबाबत राजकीय टोलवाटोलवी सुरू आहे. राम आजही वनवासातच असला तरी देशाची सुरक्षा व्यवस्था मात्र रामभरोसे आहे हे भोपाळच्या ‘तुरुंग’फोडीनंतर उघड झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- दिवाळी असली तरी मुंबईत फटाक्यांना बंदी आहे. फटाके वाजत नसल्याने दिवाळीचा मामला थंड पडला. पण मध्य प्रदेशात भोपाळ येथे जोरदार फटाके वाजले व संपूर्ण देशात त्या फटाक्यांचा आवाज घुमला आहे. कदाचित भोपाळमधील फटाक्यांचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू शकतात. भोपाळच्या सेंट्रल जेलमधून ‘सिमी’चे आठ अतिरेकी पळून गेले. त्या सर्व अतिरेक्यांना आता गोळ्या घालून यमसदनी पाठविण्याचे शौर्य पोलिसांनी गाजवले आहे. भोपाळच्या रस्त्यांवर आठ अतिरेक्यांचे मुडदे छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत व आपल्याच देशातील काही लोक त्या मुडद्यांसाठी ‘मातम’ करीत आहेत. ‘पोलिसांनी काय हे क्रौर्य केले? पोलिसांनी काय हे अमानुष व निर्घृण काम केले?’ असे वक्तव्य करून दहशतवाद्यांचे मनोबल वाढविण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे.
 
- भोपाळात जे घडले त्यास दुसरी बाजू आहे. ‘सिमी’चे आठ अतिरेकी सेंट्रल जेलमधून पळून जातात हे सरकारसाठी लांच्छनास्पदच होते. राष्ट्रीय सुरक्षेचा हा खेळखंडोबाच आहे. त्याचे समर्थन कोणी करू नये. भारतीय जनता पक्षाचे राज्य येऊनही प्रभू श्रीरामांचा वनवास संपला नाही. अयोध्येत राममंदिर उभारणीबाबत राजकीय टोलवाटोलवी सुरू आहे. राम आजही वनवासातच असला तरी देशाची सुरक्षा व्यवस्था मात्र रामभरोसे आहे हे भोपाळच्या ‘तुरुंग’फोडीनंतर उघड झाले. दिवाळीच्या धामधुमीचा फायदा घेत तुरुंगातून पळून जाण्याचा कट ‘सिमी’च्या आठ भयंकर अतिरेक्यांनी रचला व त्यात ते यशस्वी झाले. रामशंकर या तुरुंग रक्षकाची गळा चिरून हत्या केली. चादरीचा दोरासारखा वापर करून भिंतीवरूनच उड्या मारून सिमीचे हे अतिरेकी पसार झाले, पण भोपाळपासून जवळच पोलिसांनी त्यांना घेरले व ठार केले. प्रश्‍न इतकाच आहे की, अतिरेकी चकमकीत मारले गेले म्हणून सरकारचे कौतुक करायचे, की तुरुंग फोडून अतिरेकी पळून गेले म्हणून सरकारला जोडे हाणायचे? 
 
- हिंदी सिनेमात असे प्रसंग नेहमीच पाहायला मिळतात. तुरुंगाचे लोखंडी गज वाकवून किंवा उंच भिंतीवरून पलीकडे उडी मारून खलनायक फरारी होतो. पण हे असे फक्त हिंदी सिनेमांतच घडू शकेल. प्रत्यक्षात हे शक्य नाही, असे सांगून आपणच आपले समाधान करून घेत असतो. पण फक्त सिनेमातच नाही तर प्रत्यक्षात हे असले प्रकार घडू शकतात हे भोपाळच्या घटनेने दाखवून दिले. हे आठही दहशतवादी ‘सिमी’चे आहेत व त्यांचे कारनामे राष्ट्रद्रोही आहेत. त्यामुळे त्यांना तुरुंगात इतकी मोकळीक कोणी मिळवून दिली? 
 
- मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सुशासन अनेक वर्षांपासून आहे व मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी तर विजयाची हॅटट्रिकच केली आहे. त्यामुळे भोपाळ तुरुंगातून आठ दहशतवादी पळाले याचे खापर काँग्रेसवर फोडता येणार नाही व राहुल गांधी यांना राज्य कारभाराचे ज्ञान नाही अशी पुडी कुणाला सोडता येणार नाही. आठ दहशवाद्यांनी पलायन केल्यावर सर्वत्र ‘हाय अ‍ॅलर्ट’चा इशारा देण्यात आला होता. हा मोठाच विनोद आहे. हे आठ अतिरेकी पळून जाऊन काय करतील व त्यांचे मनसुबे काय असतील, हे सांगण्याची गरज नव्हती. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून ते हिंदुस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावतील व त्यासाठीच त्यांनी पलायन केले. हा मोठा कट असावा. बाहेरून त्यांना मदत झाली आहे व याबाबत माहिती मिळवण्यात आपली सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर विभाग कुचकामी ठरला आहे. 
 
- भोपाळ तुरुंगात अनागोंदी होती व भिंती कमकुवत असल्याचे आता उघड झाले आहे हेसुद्धा गंभीरच आहे. भोपाळातील चकमककांडावर नेहमीप्रमाणे प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात असले तरी जे मारले गेले ते सर्वच जण बॉम्ब बनविण्यात तरबेज होते. तुरुंग फोडून पळून जाण्यामागे त्यांचे भयंकर कारस्थान कशावरून नसेल? इशरत जहां प्रकरणाची पुनरावृत्ती भोपाळच्या रस्त्यांवर झाली. चकमक खरी की खोटी, यावर तोंडाची डबडी वाजवणार्‍या निधर्मीवाद्यांना शेवटी इतकेच सांगायचे आहे की, भोपाळची चकमक खरी असेल तर पोलिसांना हजार सलाम आणि दिग्विजय सिंहांसारखे लोक म्हणतात त्याप्रमाणे, चमकम ‘बनावट’ असली तरी देशाविरुद्ध कट रचणारे व बॉम्ब बनवणारे लोक मारले गेले आहेत हे विसरू नये व पोलिसांना बदनाम करू नये!