रेल्वे पोलिसांची कारवाई: तिघांना अटकअहमदनगर : रेल्वेत प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लूटमार करणार्या दौंड येथील टोळीचा म्होरक्या पंकज दिलीप निमजे याच्यासह तिघांना नगर रेल्वे स्थानकावर सापळा लावून पोलिसांनी पकडले़या टोळीकडून आणखी तिघांची नावे पुढे आली असून, लखनौ एक्स्प्रेस, राजकोट एक्स्पे्रसमध्ये लुटीचा प्रकार या टोळीकडून करण्यात आल्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली आहे़पंकज दिलीप निमजे (२२),संतोष दादाराव वेी (३५),कुमार रमेश सरोटे (३५) अशी लुटारुंची नावे आहेत़ उन्हाळ्याच्या सुीत रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी असते़ याचा फायदा घेत प्रवाशांना लुटणारी टोळी अनेक दिवसांपासून सक्रिय होती़ या प्रकाराला आळा घालण्यासाठी नगर रेल्वे पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले होते़ पथकाने दौंडे रेल्वे स्थानकापासून गोवा एक्स्प्रेस, कोपरगाव दरम्यान जनरल बोगीतून प्रवास करताना पोलिसांना अकोळनेर जवळ रेल्वेत चोर शिरल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार नगर रेल्वेस्थानकात सापळा लावण्यात आला़ नगर रेल्वेस्थानक येथून शिर्डी- मुंबई रेल्वेत बसून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला़ मात्र पोलिसांनी आरोपींचा म्होरक्या पंकज याला पकडले़त्यानंतर त्याच्याकडून आणखी तिघांची नावे निष्पन्न झाली असून, इतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़टोळीतील पंकज हा रेल्वे कर्मचार्याचा मुलगा आहे़ रेल्वेची बारीक सारीक माहिती त्याला होती़ त्यामुळे ते सहजपणे रेल्वेत लुटमार करायचे. मात्र, पोलिसांनी अखेर सापळा लावून ही टोळी जेरबंद केली़ आरोपींना मनमाड येथील लोहमार्ग न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ (प्रतिनिधी)
रेल्वेत लुटणारी टोळी गजाआड!
By admin | Updated: May 8, 2014 22:32 IST