शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

रणरणत्या उन्हात उमेदवारांच्या रॅली

By admin | Updated: April 6, 2015 04:18 IST

राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या वांद्रे (पू) मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील प्रमुख पक्षाच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रविवारी पूर्ण दिवस प्रचाराचा

मुंबई : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या वांद्रे (पू) मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील प्रमुख पक्षाच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रविवारी पूर्ण दिवस प्रचाराचा धडाका लावला. मतदानासाठी अवघे आठ दिवस शिल्लक राहिल्याने आजचा सुट्टीचा दिवस मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्णपणे व्यतित केला. रणरणत्या उन्हाच्या तडाख्यात रोड शो, पदयात्रा आणि कोपरा सभा घेतल्या. घामाच्या धारा वाहत असताना कार्यकर्त्यांकडून नेते व पक्षाच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी युतीच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्यासाठी खेरवाडीत काढलेल्या रोड शोला शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी पक्षाचे प्रवक्ते व जेष्ठ अभिनेते राज बब्बर यांची बहेराम पाड्यात रॅली व सभा घेण्यात आली. तर एमआयएमचे उमेदवार रहबार खान यांच्यासाठी खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी भारतनगर, मिल्लत नगर परिसरात कोपरा सभा झाल्या.सेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पक्षाच्या नेत्यांकडून त्याचा प्रचार सुरु असलातरी आज पहिल्यादा ठाकरे कुटुंबातील व्यक्ती प्रत्यक्षात प्रचारात सहभागी झाली. युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी खैरवाडीत रोड शो काढला. साडेदहाच्या सुमारास त्याला प्रारंभ झाला. यावेळी सेनेचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा व शिवसेनेचा जयघोष करीत रॅली शाखा क्रमांक ९०, गोळीबार रोड मार्गे सातांकु्रझ पूर्व शिवसेना शाखा क्रं.८६ ते परत मुख्य ठिकाणावर या रोड शो ची सांगता झाली. भगवे झेडे व धनुष्यबाणच्या प्रतिकृती नाचवित शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. येत्या दोन,तीन दिवसांत सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी पक्षाच्या नेत्यांना पाचारण केले आहे. कॉँग्रेसमधील मुस्लिम नेते, उत्तर भारतीय नेत्यांची मदत घेतली जात आहे.