शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वाईमध्ये लाचखोर नगराध्यक्षांच्या विरोधात मोर्चा

By admin | Updated: June 13, 2017 11:44 IST

लाचखोर नगराध्यक्षांच्या विरोधात राष्ट्रवादीकृत तीर्थक्षेत्र आघाडीच्यावतीने मंगळवारी सकाळी शहरातून मोर्चा काढण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 13-  14 हजारांची लाच घेताना वाईतील भाजपच्या नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना रंगेहाथ पडकण्यात आलं होतं.  यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीकृत तीर्थक्षेत्र आघाडीच्यावतीने मंगळवारी सकाळी शहरातून मोर्चा काढण्यात आला. महागणपती घाटावरून किसनवीर चौक, मारवाडी गल्ली आणि भाजी मंडईवरून हा मोर्चा नगरपालिकेत आला. या ठिकाणी निषेध सभा झाली. वक्त्यांनी आपल्या भाषणात नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत, सर्व नगरसेवक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्यासह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
वाई पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असली तरी भाजपच्या चिन्हावर डॉ. प्रतिभा शिंदे अवघ्या एक मतानं थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे शिक्षक पती सुधीर शिंदे यांना 10 जून रोजी ठेकेदाराकडून १४ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं.
 
आणखी वाचा
 

वाईच्या भाजपा नगराध्यक्षांना लाच घेताना अटक

 
 
संबंधित ठेकेदाराने वाईमध्ये सार्वजनिक शौचालयाची कामं केली होती. त्या कामाचे १ लाख ४० हजार बिल काढण्यात आले होते. त्या काढलेल्या बिलाच्या मोबदल्यात तसंच उर्वरित कामाच्या ८ लाखांचं प्रलंबित बिल काढण्यासाठी दहा टक्के प्रमाणे १४ हजार रुपयांची मागणी नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी ठेकेदाराकडे केली होती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार नोंदविली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
 
प्रतिभा शिंदे यांचा पती सुधीर शिंदे यांनी त्यांच्या दवाखान्यामध्ये संबंधित ठेकेदाराला पैसे घेऊन बोलावले होते. या वेळी स्वत: नगराध्यक्ष प्रतिभा शिंदेही तेथे हजर होत्या. संबंधित ठेकेदाराने १४ हजारांची रोकड सुधीर शिंदे यांच्या हातात देताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं होतं. तर लाचेची मागणी केल्यामुळे प्रतिभा शिंदे यांनाही तत्काळ अटक करण्यात आली.
शिंदे या पेशाने डॉक्टर असून, केवळ एक मताने भाजपाकडून थेट जनतेतून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, वाई नगरपालिकेत विरोधी राष्ट्रवादीच्या आघाडीची सत्ता आहे. त्यांचे पती द्रविड हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. 
 
आणखी वाचा

 

नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचा पालिकेत गोंधळ