शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नाराज असलो तरी राजीनामा देणार नाही - राकेश मारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2015 11:32 IST

माझ्या राजीनाम्याचे वृत्त चुकीचे आहे, मी नाराज असलो तरीही राजीनामा देणार नाही असे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ९ - मुंबई पोलिस आयुक्तपदावरून अचानक उचलबांगडी झाल्यामुळे नाराज झालेले राकेश मारिया यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांनी जोर धरू लागलेला असतानाच ' माझ्या राजीनाम्याचे वृत्त निरर्थक व निराधार अाहे. मी नाराज असलो तरीही राजीनामा देणार नाही' असे खुद्द मारिया यांनीच स्पष्ट केले आहे. 

मारिया यांचा कार्यकाळ या महिनाअखेरीस संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली असून अहमद जावेद यांची पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. या आकस्मिक बढतीमुळे नाराज झालेल्या मारिया यांनी होमगार्डचा पदभार स्वीकारला, मात्र त्यानंतर लगेच ते किरकोळ रजेवर गेले. त्यामुळे नाराज मारिया आता पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली असता खुद्द मारिया यांनाच आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. 

दरम्यान हायप्रोफाईल शीना बोरा हत्याप्रकरणात मारियांनी विशेष लक्ष घातल्यानेच त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा सुरू असून त्यांच्या बदलीवर सोशल मीडिया व प्रसारमाध्यमातू टीकेचा जोरकस सूर उमटला. त्यामुळेच शीना बोरा हत्याकांडाचा तपास मारिया यांच्याकडे ठेवून सरकारने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.