शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

राजवर्धन यांच्या राजकीय प्रवेशाला तूर्त ‘रेड सिग्नल’

By admin | Updated: August 3, 2015 00:08 IST

जयंतरावांचे संकेत : शिक्षण अगोदर, नंतर राजकारण..! शैक्षणिक गुणवत्तेवर प्रशंसेची मोहोर

अशोक पाटील -इस्लामपूर राजकारण म्हणजे समाजसेवा, हे समीकरण राहिलेले नाही. राजकारण हा व्यवसाय झाला आहे. राजकारणाला गुणवत्ता लागत नाही. सध्या राजकारणाला चांगले दिवस नाहीत. राजवर्धनची शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे. तो लंडनमधील एका नामांकित संस्थेत शिक्षण घेणार आहे. त्याला राजकारणात आणण्याचा सध्या तरी विचार नाही, असे मत माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा चालविण्यासाठी उरुण परिसरातील काही ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन शिक्षणासाठी परदेशात निघालेल्या जयंत पाटील यांना राजकारणात आणले. त्यावेळी त्यांना तालुक्यातील काही नेत्यांनी विरोधही केला होता. वाळवा तालुक्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु याला स्वत: जयंत पाटील यांच्याकडूनच नकार आहे. परंतु जयंत पाटील यांच्या नकारात होकार असतो, हे त्यांच्या समर्थकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.सध्या सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांची राजकीय ताकद वाढत आहे. त्यांचे थोरले बंधू भगतसिंह पाटील मुंबई येथे उद्योग क्षेत्रात आहेत. जयंतरावांचे राजकीय वारसदार म्हणून सध्या तरी कोणी नाही. त्यांच्याच घरातील जि. प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांना जयंतरावांनी राजकारणात विविध पदांवर संधी दिली आहे. परंतु देवराज यांचा जिल्हा पातळीवर पाहिजे तेवढा प्रभाव दिसला नाही, तर कासेगाव जि. प. मतदारसंघात काही गावातून त्यांना विरोध होत असल्याचे दिसते.जयंतरावांंनी राजारामबापू उद्योग समूहासह काही क्षेत्रात पै-पाहुण्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दिलीपतात्या पाटील यांना दिले. राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांना राज्य पातळीवरील संस्थेवर वर्णी लावण्यासाठी जयंत पाटील यांचेच मोठे योगदान आहे. हे दोन्ही नेते ज्येष्ठ असल्याने ते जयंतरावांचे राजकीय वारसदार होऊ शकले नाहीत.वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, आर. आर. पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री मदन पाटील आणि जयंत पाटील यांच्यामध्ये राजकीय वर्चस्वासाठी यापूर्वी झालेले अंतर्गत मतभेद राज्यातील राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहेत. त्याचबरोबर या नेत्यांच्या राजकीय वारसदारांचीही चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगत असते. वसंतदादा पाटील यांच्या राजकीय वारसांमध्ये मतभेद आहेत. आर. आर. पाटीलही आपला राजकीय वारस तयार करण्यात अयशस्वी ठरले. पतंगराव कदम यांनी विश्वजित कदम यांना आपला राजकीय वारस म्हणून पुढे आणले आहे. आता जयंतरावांच्या वारसदाराची चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचा विषय...जयंत पाटील यांचा राजकीय प्रवेश म्हणजे अचानक घडलेली घटना म्हणावी लागेल. अद्याप त्यांचे पुत्र राजकारणात सक्रिय झाले नसले तरी, त्यांच्या राजकीय प्रवेशाचा विषय कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचा बनला आहे.