शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजुरी स्टीलला २५ वर्षे पूर्ण

By admin | Updated: April 27, 2016 05:10 IST

स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या पिळदार सळईचे उत्पादन करीत असत.

जालना : स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्या पिळदार सळईचे उत्पादन करीत असत. मात्र, त्याचा दर्जा चांगला नसल्याने त्याचे आयुष्य जास्त नव्हते. काही कंपन्यांनी टीएमटी सळई उत्पादनासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणले. मात्र, त्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. या कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढत १९९१ मध्ये स्थापन झालेल्या राजुरी स्टीलने २००३ मध्ये जर्मन तंत्रज्ञानावर आधारित दर्जेदार व गुणवत्तापूर्ण टीएमटी सळईचे उत्पादन करुन बांधकाम क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे.राजुरी स्टीलने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, स्टील बाजारात गुणात्मक आणि दर्जात्मक उत्पादनामुळे आपला वेगळा ठसा उमटवला आहे. २००३ पर्यंत टीएमटी प्रकारच्या सळई उत्पादनात काही विशिष्ट कंपन्यांची मक्तेदारी होती. तसेच या उत्पादनांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. नेमकी हीच बाब हेरुन राजुरी स्टीलने अद्ययावत जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ५०० टीएमटी सळईचे उत्पादन सुरू केले आणि हीच स्टील बाजारात ‘राजुरी’ने घडवून आणलेली क्रांती होय. यानंतर राज्यासह देशातील अनेक भागात टीएमटी सळईचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. या उत्पादनामुळे बांधकाम क्षेत्राला भरारी येऊन सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न आकार घेऊ शकले. हेच राजुरीच्या यशाचे गमक आहे. ‘राजुरी’ सळई उत्पादनासह स्पांज आर्यन निर्मिती करीत आहे. त्याचबरोबर कंपनीने अद्ययावत प्रयोगशाळा उभारून नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे अधिकाधिक दर्जेदार सळईचे उत्पादन सुरू केले आहे. ज्यामुळे बांधकाम क्षेत्रात राजुरीने आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे. प्रयोगशाळेमुळे उत्पादनाचे बारकाईने संशोधन करून ते अधिकाधिक चांगले कसे होईल, यासाठी कंपनी व्यवस्थापन कसोशीने प्रयत्न करत आहे. कंपनीने चंद्रपूरमध्येही उत्पादन सुरू केले आहे. याशिवाय उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी राज्यभर मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती व माहिती दिली जात आहे. यात आतापर्यंत जवळपास १५०० मिस्त्री मेळावे, सुमारे २०० अभियंत्यांचे मेळावे घेऊन उत्कृष्ट स्टीलबाबत जनजागृती करण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या उद्योगाला नवी दिशा दिली. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे ५ ते ७ हजार लोकांना रोजगार दिला. सुरुवातीच्या काळात पिळदार सळई केली जात असे. पण राजुरीने जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करुन ५०० टीएमटीची क्षमता असलेल्या सळईची निर्मिती सुरू केल्याने लोखंडाची बचत होऊन बांधकामाचा दर्जा सुधारला आहे. >सामाजिक कार्यातही अग्रेसर४केवळ व्यवसाय वा उद्योगच न करता सामाजिक बांधिलकीही जपली जावी, या भावनेतून राजुरी स्टीलच्या वतीने सात वर्षापूर्वी स्त्री भ्रूण हत्या विरोधात राज्यभरात पथनाट्य, भित्तीपत्रके, समुदेशन याद्वारे जनजागृती करण्यात आली.या परिणामस्वरूपी आज राज्यातील विविध जिल्ह्यात स्त्री दर जन्मदाराचा वाढल्याचे शासकीय आकडेवारीवरून दिसून येते.