शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला दीडपट हमीभाव द्या - राजू शेट्टी

By admin | Updated: July 10, 2017 04:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे/नंदुरबार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करू शकणार नाहीत, असे भाकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी किसान मुक्ती यात्रेदरम्यान झालेल्या सभेत वर्तविले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ६ ते १८ जुलै अशी मध्य प्रदेशातील मंदसौर येथून किसान मुक्ती यात्रा निघाली आहे. रविवारी यात्रा धुळ्यात आली. जय किसान आंदोलनाचे योगेंद्र यादव, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक डॉ़ सुनिलम, संयोजक व्ही़एम़सिंह, नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. रविवारी सकाळी शहादा (जि. नंदुरबार) येथे सभा झाली. धुळ्यात शेतकरी संघटनेचे नेते रवी देवांग यांनी रस्त्यालगत उभे राहून यात्रेला हात दाखवून थांबवले़ प्रतिभा शिंदे, योगेंद्र यादव यांनी रवी देवांग यांच्याशी चर्चा करून निवेदन स्वीकारले़ जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यात बदलाची गरज शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी मांडलेली खुल्या अर्थव्यवस्थेची संकल्पना आम्हालाही मान्य आहे, पण त्यासाठी कायद्यात बदलासह अनेक अडथळे आहेत. खुल्या व्यवस्थेसाठी अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदलाची गरज आहे़, असे शेट्टी यांनी सांगितले.