शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टींचे ‘वर्षा’वर लोटांगण

By admin | Updated: May 12, 2015 01:21 IST

भाजपाची मस्ती उतरवू, असे चार दिवसांपूर्वी म्हणणारे खासदार राजू शेट्टी मंत्रिपद व महामंडळाच्या तुकड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर

कोल्हापूर : भाजपाची मस्ती उतरवू, असे चार दिवसांपूर्वी म्हणणारे खासदार राजू शेट्टी मंत्रिपद व महामंडळाच्या तुकड्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर लोटांगण घातल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा गौरव करणारा मी कार्यकर्ता होतो पण आमचे राजू शेट्टीसाहेब असे का वागू लागले, त्यांना एकदम शेतकऱ्यांचा विसर कसा पडला, याबद्दल धक्का बसल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.येथे पत्रकार परिषदे बोलताना मुश्रीफ म्हणाले, सांगलीत साखर परिषद घेऊन ‘भाजपाची मस्ती उतरवू, दोन दिवसांत पालकमंत्र्यांना घेराव घालू’, अशा वल्गना राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी केल्या; पण दोन दिवसाच्या आतच मंत्रिपद व महामंडळाच्या तुकड्यांसाठी ‘वर्षा’वर लोटांगण घातले. दुसरीकडे, शरद पवार यांच्याकडील कृषीखाते जाऊन वर्ष झाले तरी त्यांच्यावर टीका करत आहेत. ते काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही, पालकमंत्र्यांच्या गाड्या अडवणारे ‘वर्षा’वर गुडघे टेकत का गेले, असा सवाल त्यांनी केला.आता शेतकऱ्यांना वालीच कोणी राहिलेला नाही, आम्हालाच आंदोलन हातात घ्यावे लागणार आहे. दोन दिवसांत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, तरीही त्यांनी पॅकेज दिले नाहीतर त्यांना घेराव घालू, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. (प्रतिनिधी)