शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राज यांचे भाषण पुरावा ठरत नाही -हायकोर्ट

By admin | Updated: August 6, 2016 05:13 IST

जयदेव यांनी राज ठाकरे यांच्या मार्च २०१४मधील भाषणांची सीडी उच्च न्यायालयात पुरावे म्हणून सादर केली

मुंबई : बाळासाहेबांच्या इच्छापत्रावरून सुरू असलेल्या वादात आपली बाजू भक्कम करण्यासाठी जयदेव यांनी राज ठाकरे यांच्या मार्च २०१४मधील भाषणांची सीडी उच्च न्यायालयात पुरावे म्हणून सादर केली, मात्र उच्च न्यायालयाने भाषण पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यास नकार दिला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीदरम्यान सेंट्रल मैदानावर भाषण केले होते. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. याचा आधार घेत जयदेव यांनी राज ठाकरे यांच्या २०१४च्या भाषणाच्या सीडी पुरावे म्हणून वापरण्यात याव्यात, अशी विनंती न्या. गौतम पटेल यांच्याकडे केली. मात्र जयदेव ठाकरे व्हिडीओ क्लिपचे लेखक नाहीत किंवा निर्माते नाहीत. केवळ त्यांनी भाषणाची व्हिडीओ क्लिप सादर केली म्हणून ती पुरावा म्हणून स्वीकारणे शक्य नाही, असे म्हणत न्या. पटेल यांनी जयदेव यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाची व्हिडीओ क्लिप पुरावे म्हणून सादर करून घेण्यास नकार दिला.तरीही जयदेव यांच्या साक्षीदारांच्या यादीत राज यांचे नाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. २०११मध्ये बाळासाहेबांनी तयार केलेल्या कथित इच्छापत्रानुसार, बहुतांशी संपत्ती उद्धव ठाकरे यांच्या नावावर केली आहे. या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. (प्रतिनिधी)