शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

राज यांची हाराकिरी की जुगार?

By admin | Updated: June 2, 2014 05:38 IST

मनसे हा पक्ष संपूर्ण राज्यात पसरलेला नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता मिळविणे हे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारी प्राथमिक बाब असलेली राज्यव्यापी संघटना या पक्षाकडे नाही

ठाणे : या, मला आपल्याशी बोलायचंय, अशा भावनिक आवाहनाद्वारे विराट सभा घेऊन त्यात मी निवडणूक लढविणार अशी राज ठाकरे यांनी केलेली घोषणा म्हणजे अंतिम हाराकिरीचा जुगार आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात आणि मनसेच्याच गोटात व्यक्त होत आहे. मनसे हा पक्ष संपूर्ण राज्यात पसरलेला नाही. त्यामुळे स्वबळावर सत्ता मिळविणे हे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारी प्राथमिक बाब असलेली राज्यव्यापी संघटना या पक्षाकडे नाही. तसेच मोजके जिल्हे वगळता पक्षाचा प्रभाव नाही, कार्य नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपले संख्याबळ सध्यापेक्षा वाढविणे व कुणालाच बहुमत मिळाले नाही, तर किंगमेकरची भूमिका प्राप्त करणे त्यासाठी लागणारा चेव आणि ईर्षा कार्यकर्त्यांत निर्माण करणे एवढाच हेतू या घोषणेमागे असल्याचे जाणवते. पक्षाने उभ्या केलेल्या बहुसंख्य उमेदवारांचे डिपॉझिट लोकसभा निवडणुकीत जप्त झाले. त्यामुळे पक्षाचे मनोधैर्य खचले होते. पक्षाला जिथे जिथे सत्ता मिळाली त्या नाशिक महानगरपालिका व कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधींची कामगिरी अपेक्षेइतकी झाली नाही. त्यामुळे पक्षात कोणत्याच आघाडीवर समाधानकारक वातावरण नाही. राज यांची पकड संघटनेवर आहे, असेही जाणवत नाही. ज्या महापालिकेची सत्ता मनसेकडे आहे, त्या नाशिक महानगरात दरवर्षाला महानगरप्रमुख बदलण्याची वेळ राज यांच्यावर आलेली आहे. आधी नितीन भोसले, मग समीर शेटे, मग राहुल ढिकले अशी ही तिकडम नाशकात झाली आहे. विधानसभेतील गट उपनेते वसंत गीते यांच्या आग्रहाला मान देऊन महापौर दिलेल्या अ‍ॅड़ वाघ यांनी ठसा उमटवणे सोडा अस्तित्वही दाखविलेले नाही. अशीच स्थिती कल्याण-डोंबिवली व ठाणे पालिकेत आहे. ही खेळी धोकादायक आहे. कारण जर शिवसेना आणि अन्य पक्षांनी तिथे सगळी ताकद लावून राज यांचा पराभव घडविला, तर त्यातून पक्षाचे मानसिक खच्चीकरण होईल़ त्यातून पक्ष पुन्हा उभा राहणे अवघड असेल. राज यांना महायुती जवळ करणे अशक्य आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हेदेखील उघड जवळ करणार नाहीत. ठाकरे घराण्याभोवतीचे जे वलय आजवर टिकून राहिले त्याचे कारण ज्या सत्तेसाठी सगळे जण साठमारी खेळतात, त्या सत्तेपासून ठाकरे कुटुंबीय सतत दूर राहत आलेले आहे. कोणतीही निवडणूक लढविणार नाही, कोणतेही सत्तापद स्वीकारणार नाही़ माझ्या दृष्टीने संघटनेचे सर्वोच्चपद हे सर्वोच्चपद आहे. अशा काहीशी नि:स्वार्थ आणि संन्यस्थ विचारांनी शिवसेनाप्रमुख आयुष्यभर वागले, म्हणून हे वलय त्यांना लाभले. परंतु त्याला ठाकरे कुटुंबाचा वारस असलेल्या राज यांनी निवडणूक लढविणार, असे घोषित करून सोडचिठ्ठी दिली आहे. मनसेतील काही सूत्र असेही सांगतात की, राज प्रत्यक्षात निवडणूक लढविणारही नाहीत़ ते सत्तेपासून दूर या राजकीय तत्त्वाशी व ठाकरे घराण्याच्या व्रताशी एकनिष्ठ राहतील़ त्यांनी केवळ पक्षात प्राण फुंकण्यासाठी निर्वाणीचा उपाय म्हणून या घोषणास्त्राचा वापर केला असावा. परंतु तसे घडले तरी राज यांच्यावर निवडणुकीच्या रणांगणातून लढण्यापूर्वीच पळ काढला, अशी टीका होऊ शकते.