शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

दहशतवाद्यांना वाचवणा-यांवर तेवढीच कडक कारवाई करणार - राजनाथ सिंह

By admin | Updated: April 12, 2017 10:59 IST

लष्करप्रमुखांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना जे कोणी मधे येईल त्यांना परिणाम भोगावे लागतील केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - लष्करप्रमुखांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना जे कोणी मधे येईल त्यांना परिणाम भोगावे लागतील केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. संकटाच्या वेळी धाव घेणारे जवान पेलेट गनचा वापर जाणुनबुजून का करतील हा विचार लोकांनी करायला हवा असंही राजनाथ सिंह बोलले आहेत. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात बोलताना राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं. आजतक वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका अंजना ओम कश्यप यांनी राजनाथ सिंह यांची मुलाखत घेतली. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तान जाधव यांना भारताचा गुप्तहेर असल्याचं सांगत आहे. आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने समाजाला दिशा आणि प्रेरणा देण्याचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्याच्या "लोकमत"च्या संकल्पाचे चौथे पर्व यंदा साकारत आहे. 
 
यूपीएल प्रस्तुत लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने साकारत आहे.
 
(कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडू - राजनाथ सिंह)
(उत्तरप्रदेशात एवढ्या जागा जिंकू वाटलंच नव्हतं - राजनाथ सिंह)
(कुलभूषण जाधव पाकिस्तानची पूर्वनियोजित हत्या - राजनाथ सिंह)
(दाऊद इब्राहिम कराचीतच - राजनाथ सिंग)
(कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडू - राजनाथ सिंह)
 
जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर बोलताना राजनाथ सिंह यांनी "वर्षभरात जम्मू काश्मीरमध्ये बदल झालेला दिसेल", असा विश्वास व्यक्त केला आहे. "फारुख अब्दुल्ला यांनी जवानांवर दगडफेक करणा-यांचं केलेलं समर्थन चुकीचं असून त्यांनी असं करायला नको होतं", असं म्हणत राजनाथ सिंह यांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. "दगडफेक करणा-यांवर नियंत्रण आणण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत असं विचारलं असता सरकार आपलं धोरण खुलं करु शकत नाही", असं स्पष्ट केलं आहे. 
 
कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे असं विचारलं असता, "कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व करणार. पण काहीही करु त्यांना वाचवणार. कुलभूषण जाधव जर गुप्तहेर असते तर त्यांनी भारतीय पासपोर्ट जवळ ठेवला नसता. पाकिस्तानच्या या कृत्याचा भारत निषेध करतो", असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. तसंच हा एक प्री प्लान मर्डर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला आहे. 
 
"पाकिस्तानवर काय उपचार करायचा ते वेळ सांगेल. कोणाचाही स्वभाव बदलण्यास वेळ लागतो. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायदेशीर नियमांचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानविरोधात आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवू असं सांगत पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी पुर्ण प्रयत्न करणार असल्याचं", सांगत राजनाथ सिंह यांनी भारतीयांना आश्वस्त केलं आहे.
 
जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवर बोलताना राजनाथ सिंह यांनी "वर्षभरात जम्मू काश्मीरमध्ये बदल झालेला दिसेल", असा विश्वास व्यक्त केला आहे. "फारुख अब्दुल्ला यांनी जवानांवर दगडफेक करणा-यांचं केलेलं समर्थन चुकीचं असून त्यांनी असं करायला नको होतं", असं म्हणत राजनाथ सिंह यांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. दगडफेक करणा-यांवर नियंत्रण आणण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत असं विचारलं असता सरकार आपलं धोरण खुलं करु शकत नाही असं स्पष्ट केलं आहे. 
 
 "उत्तरप्रदेशातील विजयावर बोलताना आमचं स्पष्ट बहुमत येईल याचा मला विश्वास होता. पंतप्रधानांनाही मी तसं सांगितलं होतं. पण मला वाटलं होतं जास्तीत जास्त 250 जागा येतील.  325 आकडा आमच्यासाठी अविश्वसनीय होता", अशी कबुली राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली. मुस्लिमांना तिकीट दिलं गेलं नाही असं विचारलं असता, "जो विजयी होईल त्यालाच तिकीट दिलं", असं उत्तर राजनाथ सिंह यांनी दिलं. "कोणता उमेदवार विजयी होईल यादृष्टीने तिकीटवाटप केलं जातं. मुस्लिमांनाही तिकीट दिलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये मुस्लिमांना तिकीट दिलं आहे", असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
 
 ट्रिपल तलाकवर आमची भूमिका स्पष्ट आहे. कुराणाताही त्याचा उल्लेख नाही. सर्वांसोबत न्याय झाला पाहिजे असं स्पष्टपणे राजनाथ सिंह यांनी सांगितलं. "राम जन्मभूमीचा वाद न्यायालयात आहे, मध्यस्थी करण्याच्या निर्णयाचं स्वागत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांशी बोलून पर्याय काढणार असतील तर त्याचं स्वागत आहे", असंही त्यांनी सांगितलं. 
 
दाऊद इब्राहिमवर बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, "दाऊद इब्राहिमवर एकूण 33 केसेस आहेत. तो कराचीत आहे यामध्ये दुमत नाही. पाकिस्तानवर दबाव आणण्याचा पुर्ण प्रयत्न सुरु आहे". 
 
ज्यांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले, इथल्या मातीची शान वाढविली आणि इथे प्रगती घडवून आणली अशा १४ क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी लोकमतने उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
 
लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराच्या यंदाच्या चौथ्या पर्वातील विजेते ठरविण्याची मोलाची कामगिरी महाराष्ट्राच्या अभिमानात भर टाकणाऱ्या ११नामांकित ज्युरींनी पार पाडली. जाहीर झालेली नामांकने, त्यावर जगभरातील वाचकांनी भरभरून दिलेली मते या पार्श्वभमीवर तब्बल साडेतीन तासांच्या विचार मंथनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ११ नामवंत ज्युरींनी विजेत्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. 
 
‘लोकमत’ने केलेल्या मंथनातून जाहीर झालेली १४ कॅटेगरीतील नामांकने आणि लोकमताचा कौल यावर अंतिम निवडीचा साज चढविण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडणाऱ्या ज्युरी मंडळात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, डॉ. प्रकाश आमटे, अर्णव गोस्वामी, मिलिंद देवरा, महेश भट्ट, विक्रम लिमये, विक्रम श्रॉफ, सुनील सूद, डॉ. रमाकांत पांडा, विजय दर्डा आणि मृणाल कुलकर्णी यांचा सहभाग होता.
 
नामांकन प्राप्त व्यक्तींना जगभरातील वाचकांनी लोकमतच्या वेबसाइटवर मतदानाद्वारे दिलेली पसंती तसेच ११ नामवंत ज्युरींचा कौल यांच्या एकत्रित विचारातून या पुरस्काराचे मानकरी ठरत आहेत. तब्बल दोन दशलक्ष वाचकांनी या मतदानात सहभागी होत १४ कॅटेगरीतील नामांकनांसाठी दीड कोटी मते नोंदविली.
 
सर्व पुरस्कारांच्या माहितीसाठी क्लिक करा
lmoty.lokmat.com