शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

राजेंद्र गवईंनी काँग्रेसला दिले समर्थनाचे पत्र, फ्रंटमधून पडले बाहेर

By admin | Updated: January 29, 2017 17:42 IST

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने रिपब्लिकन फ्रंटमधून बाहेर पडत थेट काँग्रेसला आपले समर्थन जाहीर केले आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने रिपब्लिकन फ्रंटमधून बाहेर पडत थेट काँग्रेसला आपले समर्थन जाहीर केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी समर्थनाचे पत्र काँग्रेसकडे सोपविले आहे. रिपाइंच्या रूपात निळा झेंडा सोबत आल्याने काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला आहे.महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत रिपाइं स्वबळावर रिंगणात उतरली होती. काही दिवसांपूर्वी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षांच्या विविध गटांनी एकत्र येत रिपब्लिकन फ्रंट स्थापन केला होता. यात गवई यांच्या रिपाइंचादेखील समावेश होता. लोकमतशी बोलताना डॉ. राजेंद्र गवई म्हणाले, रिपब्लिकन फ्रंटची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. एक तर काँग्रेस सोबत किंवा स्वबळावर, अशी आपली भूमिका आहे. फ्रंट स्थापन झाल्यानंतर नेते आपापल्या परीने काँग्रेसशी चर्चा करीत आहेत. त्यामुळे मी आपली चर्चा करून मोकळा झालो. रिपाइंने बहुतांश जिल्ह्यात काँग्रेसला समर्थन दिले आहे. नागपुरातही आपण काँग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र काँग्रेसला दिले आहे. जागांच्या मागणीबाबत आपली काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. किमान पाच जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंजा चिन्हावर लढणारकाँग्रेसने जागा दिल्यानंतर आपल्या उमेदवारांनी कोणत्या चिन्हावर लढायचे याचा विचार सुरू आहे. चार सदस्यांचा प्रभाग आहे. तीन जागांवर पंजा आणि एका जागेवर रिपाइंचे चिन्ह राहिले तर प्रचारात आमच्या उमेदवारांची अडचण होऊ शकते. आता प्रचाराला पुरेसा वेळही राहिलेला नाही. त्यामुळे फक्त नागपूर महापालिकेत रिपाइंचे उमेदवार काँग्रेसचा ए-बी जोडून पंजावर लढू शकतात. आमच्या उमेदवारांच्या हितासाठी एवढी लवचिकता दाखवावी लागेल, असेही डॉ. राजेंद्र गवई यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.