मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते समाजातील असहिष्णुतेपर्यंत अनेक विषयांवर स्पष्टपणे मते मांडण्यावरून वादग्रस्त ठरलेले डॉ. रघुराम राजन तीन वर्षांची कारकिर्द पूर्ण करून, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरून निवृत्त झाले. स्वभावाने डॉ. राजन यांच्या अगदी उलट व मितभाषी असलेले डॉ. ऊर्जित पटेल २४ वे गव्हर्नर म्हणून मंगळवारी औपचारिकपणे सूत्रे स्वीकारतील.अर्थव्यवस्था आणि खास करून सार्वजनिक बँकांना बळकटी देण्यास आग्रही भूमिका घेण्यावरून डॉ. राजन अनेकांच्या टीकेचे धनी ठरले, पण जाणकारांनी त्यांच्या हुशारीची वाहवाहही केली. ‘माझे नाव राजन आहे आणि मला जे हवे तेच करतो,’ असे ठामपणे सांगणारे राजन ‘रॉकस्टार राजन’ आणि ‘बाँड आॅफ मिंट स्ट्रीट’ या रूपाने स्मरणात राहतील.
राजन निवृत्त, आता सूत्रे ऊर्जित पटेलांकडे
By admin | Updated: September 5, 2016 06:03 IST