शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

राजनवर आरोपपत्र दाखल करा

By admin | Updated: July 26, 2016 01:05 IST

जे. डे हत्याप्रकरणी छोटा राजनवर आरोपपत्र दाखल करण्यास वारंवार मुदतवाढ मागून घेणाऱ्या सीबीआयची सोमवारी विशेष न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली. विशेष न्यायालयाने

मुंबई : जे. डे हत्याप्रकरणी छोटा राजनवर आरोपपत्र दाखल करण्यास वारंवार मुदतवाढ मागून घेणाऱ्या सीबीआयची सोमवारी विशेष न्यायालयाने चांगलीच खरडपट्टी काढली. विशेष न्यायालयाने सीबीआयला छोटा राजनवर ५ आॅगस्टपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत सीबीआयने आरोपपत्र दाखल न केल्यास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे आरोपनिश्चित करू, अशी तंबीही विशेष न्यायालयाने सीबीआयला दिली.सोमवारच्या सुनावणीत सीबीआयचे वकील भरत बदामी यांनी विशेष न्यायालयाला सांगितले की, सीबीआयला फरारी आरोपी नयन सिंग बिश्तविरुद्ध पुरावे हाती लागले असून ते ही आरोपपत्राला जोडायचे आहेत. त्यामुळे छोटा राजनवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत द्यावी. सीबीआय आरोपपत्र दाखल करण्यासाठी विलंब करत आहे, हे लक्षात येताच विशेष न्यायालयाने सीबीआयला फैलावर घेत आरोपपत्र दाखल करण्यासाठी ५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. ‘५ आॅगस्टपर्यंत आरोपपत्र दाखल करा, अन्यथा मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे आरोपीवर (छोटा राजन) आरोप निश्चित करू,’ अशी तंबीही विशेष न्यायालयाने सीबीआयला दिली. गेल्यावर्षी २५ आॅक्टोबरला छोटा राजनला इंडोनेशियातील बाली विमानतळावरून अटक करण्यात आली. छोटया राजनवर एकट्या महाराष्ट्रातून ७० केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. या सर्व केसेस राज्य सरकारने सीबीआयकडे वर्ग केल्या आहेत. तपासयंत्रणेच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ पत्रकार डे यांनी लिहीलेल्या लेखामुळे छोटा राजन अस्वस्थ होता. (प्रतिनिधी)आरोपपत्रासाठी ५ आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत११ जून २०११ रोजी छोटा राजनच्या गुंडांनी डे यांची हत्या त्यांच्या पवई येथील घराजवळ केली. याप्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने २०११ मध्ये पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये सतीश कालिया, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगवाने, विनोद असरानी, पॉल्सन जोसेफ आणि दिपक जिजोदिया यांचे नाव आरोपपत्रात आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे.