शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

रविराजचे ‘राज’ उघडले

By admin | Updated: August 8, 2014 01:13 IST

आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनीचा प्रमुख राजेश सुरेश जोशी (४४) याला बुधवारी मध्यरात्री

राजेश जोशीला अटक : ३३ जणांकडून २ कोटी लुबाडले नागपूर : आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनीचा प्रमुख राजेश सुरेश जोशी (४४) याला बुधवारी मध्यरात्री आर्थिक गुन्हेशाखेने अटक केली. त्याला गुरुवारी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. मुळे यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. जोशी हा कुटुंबासह जूनपासून बेपत्ता होता. राजेशने विवेकानंदनगर येथील आपल्य कौस्तुभ बंगल्यात जानेवारी २०१० मध्ये रविराज इन्व्हेस्टमेंट व स्ट्रॅटेजिस कंपनी या नावाने आपला गोरखधंदा सुरू केला होता. या अंतर्गत त्याने रविराज मायनिंग, रविराज अ‍ॅग्रो, रविराज वेल्थ मॅनेजमेंट, रविराज इन्फ्राकॉन आणि रविराज सेंटर फॉर सोशल रिकन्स्ट्रक्शन या नावाने वेगवेगळ्या कंपन्या सुरू केल्या होत्या. अशा होत्या योजना गुंतवणूकदारांना भुरळ पाडून लुबाडण्याच्या जोशीच्या तीन योजना होत्या. एक लाख रुपये गुंतवल्यास त्यावर महिन्याला तीन टक्के दराने तीन हजार रुपये व्याज, ही पहिली योजना होती. एक लाख रुपये गुंतवल्यास मासिक व्याज न देता तीन महिन्याचे व्याज घेतले तर १० टक्के दराने त्रेमासिक १० हजार रुपये व्याज , ही त्याची दुसरी योजना होती. तिसरी योजना ‘फिक्स डिपॉझिट’ची होती. या योजनेत गुंतवणूक केल्यास अडीच वर्षात मूळ रक्कम दुप्पट, अशी ही योजना होती. विवेकानंदनगर येथेच राहणाऱ्या विजय वामन मराठे यांनी २९ फेब्रुवारी २०१२ रोजी पहिल्या योजनेत २ लाख रुपये गुंतवले होते. त्यांना जोशी याने वचन चिठ्ठी लिहून दिली होती. त्यानुसार त्यांना २९ आॅक्टोबर २०१४ रोजी गुंतवणुकीची मूळ रक्कम परत केली जाईल, असे त्यात नमूद करण्यात आले. मराठे यांना नोव्हेंबर २०१३ पर्यंत नियमित मासिक ६ हजार रुपये व्याज मिळत गेले. त्यानंतर व्याज देणे बंद करण्यात आले. मराठे हे डिसेंबर २०१३ मध्ये जोशीच्या कार्यालयात गेले असता डेअरी प्रकल्पाला कर्ज देणे सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर जूनपासून जोशी हा कार्यालयाला कुलूप लावून आपल्या कुटुंबासह बेपत्ता झाला होता. मराठे यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात ८ जुलै २०१४ रोजी ठगबाज राजेश जोशी, कंपनीचे इतर नातेवाईक संचालक आणि एजंट यांच्याविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, १२० ब आणि महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायदा १९९९च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत ३३ गुंतवणूकदारांनी या कंपनीविरुद्ध तक्रारी नोंदवल्या असून फसवणुकीची रक्कम १ कोटी ९२ लाख ४० हजार एवढी आहे. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एन. पी. पवार यांनी जोशीला न्यायालयात हजर केले. विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख यांनी या आरोपीचा १४ दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. आरोपीचे वकील अ‍ॅड. डी. एस. श्रीमाळी आणि अ‍ॅड. राम मासुरके यांनी पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)नातेवाईकांनाच केले संचालकराजेश जोशी याने आपल्या कंपनीत पत्नी राधा जोशी, वडील सुरेश जोशी, आई सरिता जोशी आणि काका शरद जोशी यांना संचालक केलेले आहे. तो अमोल महाजन, भरत हुद्दार, नैना हुद्दार आणि पंकज चौधरकर या एजंटमार्फत गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढून लुबाडणुकीचा धंदा करीत होता. जोशीने शंकरनगर शाखेच्या महाराष्ट्र बँकेतील खात्यातून मोठे व्यवहार केलेले आहेत. तेथून तो मोठ्या रकमा अन्यत्र वळत्या करीत होता. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेतही त्याचे खाते असल्याची पोलिसांची माहिती आहे.