शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

राज ठाकरे यांचे लोकसभानिहाय मेळावे

By admin | Updated: April 24, 2017 03:52 IST

सलगच्या पराभवामुळे पक्ष संघटनेला आलेली मरगळ झटकण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे लोकसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेणार आहेत.

मुंबई : सलगच्या पराभवामुळे पक्ष संघटनेला आलेली मरगळ झटकण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे लोकसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेणार आहेत. दादर येथील राजगड कार्यालयात रविवारी मनसे नेत्यांची बैठक झाली. यात मेळाव्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. लोकसभा, विधानसभा आणि अलीकडेच महापालिका निवडणुकीत मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. पालिका पराभवानंतर पक्षाच्या वर्धापन दिनी बोलताना, हा आपला शेवटचा पराभव असेल, असे राज म्हणाले होते. मी स्वत: तुमच्याशी संवाद साधायला येईन, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार मे महिन्यात मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत कार्यकर्ते मेळावे होणार असून त्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. मनसेचे नेते, सरचिटणीस तसेच विभाग अध्यक्षांच्या या बैठकीत पक्षांतर्गत नाराजीबाबतही चर्चा झाली. या नाराजीच्या पार्श्वभूमीवर नेते व सरचिटणीस बदलाबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, असे बैठकीत मान्य करण्यात आले.९ नेते, ९ सरचिटणीस आणि तब्बल ७ प्रवक्ते अशी फळी असतानाही योग्य पद्धतीने कामे झाली नाहीत. महापालिका निवडणुकीत बहुतेक नेत्यांनी त्यांना सोपविलेले काम योग्य प्रकारे पार पाडले नाही. उलट उमेदवारी देताना अनेक घोळ घातल्याचा आरोप स्थानिक पदाधिकारी आणि मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर हे मेळावे घेण्याचा निर्णय राज यांनी घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांत मे महिन्यात राज हे मेळावे घेणार आहेत. (प्रतिनिधी)