शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेबाबत मनसेची भूमिका राज ठाकरेच ठरवतील

By admin | Updated: February 27, 2017 16:02 IST

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसह भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर, सत्ता स्थापनेसाठीच्या दोन्ही पक्षाच्या राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसह भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर, सत्ता स्थापनेसाठीच्या दोन्ही पक्षाच्या राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. शिवसेना/भाजपा सत्ता स्थापनेसाठी कोणाची मदत घेणार? या विषयी राजकीय विश्लेषकांची मतमतांतरे असतानाच, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुंबई महापालिकेत मनसेची भूमिका काय असेल यावर खुलासा केला आहे. मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक 9 मार्च रोजी होणार आहे.मनसे आणि शिवसेना महापालिकेत एकत्र आले असते तर शिवसेनेच्या जागा वाढल्या असत्या आणि शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती असे मीडियाच सांगत आहे. त्यामुळे आमची त्यावेळची भूमिका योग्यच होती, हेच यातून दिसून येत आहे. पण निवडणुकीत कोणी-कोणाचाही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू असत नाही. राजकारणात लवचिकता महत्त्वाची असते. कोणत्यावेळी लवचिक व्हायचं हे कळायला हवं. शिवसेनेबाबत लवचिक व्हायचं की नाही हा निर्णय राज ठाकरे घेतील. असे बाळा नांदगावकर म्हणाले. मराठी अस्मितेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय अंतिम निर्णय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेच घेतील आणि हा निर्णय मराठी माणसाच्या हितासाठीच असेल,असे सांगत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेना- मनसे युतीच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे. त्यामुळे शिवसेनेला मनसे टाळी देण्याची शक्यता बळावली आहे.