शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मोकळी मैदाने वाचवण्यासाठी राज ठाकरे सरसावले

By admin | Updated: January 15, 2016 16:52 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मैदाने, बागांच्या मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १५ - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मैदाने, बागांच्या मोकळ्या जागा खासगी विकासकांना देण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला. या जागा खासगी बिल्डर्सचा द्यायचा सत्ताधा-यांचा डाव असल्याची टीकाही त्यांनी केली. या निर्णयाविरोधात मनसेतर्फे मुंबईत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याची घोषणा करत त्याला कोणताही राजकीय रंग न देता मुंबईतील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज यांनी केले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनसेच्या स्थापनेपासूनच आम्ही मुंबईतील मोकळ्या जागांवर असलेली आरक्षणे हटवण्यास विरोध दर्शवला आहे, त्यापासून आम्ही मागे हटणार नाही. या मोकळ्या जागा तसेच मैदाने, बागा म्हणजे शहराची फुफ्फुसे आहेत, असे ते म्हणाले. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने काल बहुमताच्या जोरावर शहरातील १२०० एकर जागा खासगी विकासकांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला असला तरी आम्ही रस्त्यावर उतरून तो हाणून पाडू, असे राज म्हणाले. तसेच मुंबईतील रेसकोर्सवर केवळ घोडेच धावत नाहीत तर अनेक नागरिकही तिथे फिरायला येतात असे सांगत तिथेही कोणतेही बांधकाम केलं जाऊ नये असे ते म्हणाले.