शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंनी दिली ‘मोदीमुक्त’ भारताची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 05:30 IST

देशाला १९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले. १९७७ला आणीबाणीत दुसरे स्वातंत्र्य मिळाले. आता, २०१९ साली तिसरे स्वातंत्र्य देशाला मिळायला हवे. गुजरात सोडून बाकीच्या राज्यांचा नरेंद्र मोदी दुस्वास करतात.

मुंबई : देशाला १९४७ साली पहिले स्वातंत्र्य मिळाले. १९७७ला आणीबाणीत दुसरे स्वातंत्र्य मिळाले. आता, २०१९ साली तिसरे स्वातंत्र्य देशाला मिळायला हवे. गुजरात सोडून बाकीच्या राज्यांचा नरेंद्र मोदी दुस्वास करतात. लोकांची सतत फसवणूक करणारे हे सरकार आता घालवायलाच हवे. २०१९ साली ‘मोदीमुक्त’ भारत करण्याची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केले. देशाला झालेला हा आजार घालवायलाच हवा. त्यासाठी मोदींविरोधात सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही राज यांनी केले.गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवरील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी लोकांची निव्वळ फसवणूक करत आहेत. देशाला दिलेले एकही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. न्यायसंस्थेपासून माध्यमांपर्यंत सर्वांची मुस्कटदाबी केली जात आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना संपविण्यात येत आहे. देशात एक प्रकारची अघोषित आणीबाणीच लादली आहे. २०१४ पूर्वी मोदींनी ‘काँग्रेसमुक्त’ भारताचे आवाहन केले होते. महाराष्ट्र आणि देश वाचवायचा असेल, तर आता ‘मोदीमुक्त’ भारतासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही राज यांनी केले.देशातील आणि राज्यातील भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. लोकांना सांगण्यासारखे यांच्याकडे काही उरले नाही. त्यामुळे २०१९ साली निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू-मुस्लीम धार्मिक दंगली घडविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर प्रश्नावर सुनावणी सुरू आहे. २०१९च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही सुनावणी पुढे सरकेल, याची व्यवस्था भाजपाकडून केली जात आहे. निवडणुकांच्या तोंडावर बरोबर हे घडेल. राम मंदिराचा विषय घडला की, ताबडतोब दंगली घडवा, अशी चर्चादेखील या मंडळींनी काही मुस्लीम संघटनांशी केल्याचा गंभीर आरोप, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. राम मंदिर झालेच पाहिजे, पण तुमच्या राजकारणासाठी दंगली घडवून नको. निवडणुकीनंतर मंदिर झाले तरी चालेल, असे राज म्हणाले.यापूर्वीही महाराष्ट्रासह इतरत्र जातीय संघर्षाचा कट रचला जात असल्याचे मी सांगितले होते, तसेच भाकीत दाऊदबद्दल केले होते. मी काही राजकीय भविष्य सांगत नाही, पण राजकारणाबाबत माझे निश्चित ठोकताळे असतात. जातीय संघर्ष, दाऊदबद्दल ते खरे ठरले. आता या मंडळींनी हिंदू-मुस्लीम दंगलीचा डाव आखला आहे. तो उधळून लावण्यासाठी सर्वांनी जागरूक राहायला हवे, असेही राज म्हणाले.देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. आता तर बेरोजगारांची नोंद ठेवण्याचे कामच सरकारने बंद केले आहे. अमित शहा तर पकोडे म्हणजे वडे विकणे, हासुद्धा रोजगार असल्याचे म्हटले. मग मोदी इतके दिवस जगभर वड्याचे पीठ आणायला फिरत होते का? परदेश दौºयातून गुंतवणूकच आली नाही, असे राज म्हणाले.नीरव मोदी ११ हजार कोटी घेऊन पळाला, हे लोकांनी विसरावे म्हणूनच अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू माध्यमात मोठा करण्यात आला. असे कोणते क्रांतिकार्य श्रीदेवीने केले होते, ज्यामुळे त्यांचा मृतदेह हा राष्ट्रध्वजात, तिरंग्यात नेण्यात आला, असा सवालही राज यांनी केला.>हिटलरचे तंत्रमाध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले आहे. न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य गेले. एकेक यंत्रणा खिळखिळी केली जात आहे. हे सगळे हिटलरच्या तंत्रावरच सुरू आहे. हिटलर नीट वाचला, तर याचा खुलासा लगेच होईल. प्रत्येक जण सरकारबद्दल नाराज आहे. देशभरात अस्वस्थता आहे. लोकांपर्यंत सरकारविरोधी बातम्या येऊ नयेत, याची काळजी घेतली जात आहे.>कॅनेडियन ‘भारतकुमार’‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’सारखे सरकार पुरस्कृत सिनेमे सध्या येत आहेत. अक्षयकुमार दुसरा मनोजकुमार, भारतकुमार झालाय. रोज आपल्याला भारत प्रेमाचे धडे देतोय, पण हा अक्षयकुमार कुठे भारतीय आहे, त्याचा पासपोर्ट कॅनडाचा आहे.राज्यातले सगळे प्रश्नच संंपले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री, अर्थमंत्री गाण्यांचे व्हिडीओ बनवू लागले आहेत. मुख्यमंत्री म्हणजे वर्गातला मॉनिटर. शिक्षिकांचा आवडता, पण विद्यार्थ्यांचा नावडता. हे अर्थमंत्री तर रजनीकांतचा बारावा डम्मी वाटतात.शेतकºयांची शेती काढून घेतली जात आहे. त्याचा मोबदला दिला जात नाहीये. दलाल राज्य करत आहेत. समृद्धी वगैरे प्रकल्पात तेच सुरू आहे. या दलालांमुळे धर्मा पाटील या शेतकºयाला आत्महत्या करावी लागली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे