शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
4
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
5
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
6
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
7
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
8
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
9
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
10
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
11
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
12
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
13
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
14
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
15
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
16
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
17
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
18
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
19
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?

युतीसाठी राज ठाकरे आतुर

By admin | Updated: January 11, 2017 05:08 IST

आतापर्यंत ‘एकला चलो रे’चा नारा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘युतीचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू,’ असे सांगत मंगळवारी खळबळ उडवून दिली.

मुंबई : आतापर्यंत ‘एकला चलो रे’चा नारा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘युतीचा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू,’ असे सांगत मंगळवारी खळबळ उडवून दिली. एकीकडे स्वबळाच्या नारेबाजीत शिवसेना-भाजपा युतीचे घोंगडे भिजत पडलेले असताना मनसेच्या हाकेला कोण साद घालणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्ष स्थापनेपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकला चलो रे ही भूमिका घेतली होती. विकासासाठी एकहाती सत्ता द्या, अशी साद ते मतदारांना घालत. यंदाच्या महापालिका निवडणुकांसाठी मात्र युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करू, असे सांगत राज यांनी युतीबाबत सकारात्मक असल्याचे संकेत दिले आहेत. युतीसाठी राज ठाकरे यांनी साद घातली असली तरी त्यांना कोण प्रतिसाद देणार, असा प्रश्न आहे. मात्र, स्वबळाच्या लाटेवर स्वार झालेल्या शिवसेना आणि भाजपाच्या गोटात राज यांच्या या नव्या खेळीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये दिलेल्या युतीच्या प्रस्तावामुळे मनसेचे इंजिन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या स्थानिक निवडणुकांमध्ये मनसेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. राज ठाकरे यांची आक्रसलेली लोकप्रियता आणि पक्षाच्या भवितव्याबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना, भाजपाचा रस्ता धरला आहे. अशा वातावरणात शिवसेना अथवा भाजपाकडून खरोखरच मनसेला सोबत घेण्याबाबत गांभीर्याने विचार होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना-भाजपातील युतीची बोलणी फिसकटल्यानंतर उद्धव आणि राज यांच्या दरम्यान युतीबाबत चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट खुद्द राज यांनी केला होता. युतीच्या चर्चा सुरू झाल्याने फॉर्मवाटपही थांबविले होते. मात्र, शिवसेनेकडून नंतर कोणताच निरोप न आल्याने शेवटी मनसे उमेदवारांना फॉर्म वाटल्याचे राज यांनी सांगितले होेते. (प्रतिनिधी)दुहेरी आकडा गाठणार का?राज ठाकरे यांची आक्रसलेली लोकप्रियता आणि पक्षाच्या भवितव्याबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना, भाजपाचा रस्ता धरला आहे. गेल्या निवडणुकांत २८ नगरसेवक निवडून आणणाऱ्या इंजिनाला यंदा दुहेरी आकडा तरी गाठता येईल का, अशी शंका पक्षातूनच व्यक्त केली जात आहे.