शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज यांची पुन्हा शून्यातून सुरुवात

By admin | Updated: January 20, 2017 04:03 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे २० आणि २५ जानेवारीला ठाण्यात येत आहेत

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे २० आणि २५ जानेवारीला ठाण्यात येत असून सदैव शिवसेनेला साथ देणाऱ्या या शहरात त्यांना पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. ठाण्यावर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. केंद्र व राज्यात भाजपाप्रणीत सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाल्यापासून मनसेलाच गळती लागली. या पक्षातील अनेकांनी शिवसेनेत उड्या घेतल्या. त्यामुळे आता या पक्षाचा ठाण्यात एकही नगरसेवक नाही. अनेक युवकांनी मनसेची कास सोडल्याने पक्ष कमकुवत झाला आहे. २००७ साली ठाण्यात मनसेचे तीन नगरसेवक निवडून आले आणि २०१२ च्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले होते. अल्पावधीत मनसेच्या काही नेत्यांच्या डोक्यात हवा गेली. वरिष्ठांचेही पक्षाकडे दुर्लक्ष होऊ लागले. कमकुवत नेतृत्व, जनमानसात मनसैनिकांचा कमी वावर, वारंवारची आंदोलने आणि त्या आंदोलनातून समस्येचे निराकरण नाही या व अशा विविध कारणामुळे मनसेची प्रतिमा खालावली. २०१७च्या महापालिका निवडणुकीत मनसेला याची किंमत मोजावी लागणार, असा साऱ्यांचा होरा आहे.या पार्श्वभूमीवर राज यांच्याकरिता दोन आशास्थाने आहेत. त्यापैकी एक म्हणजे अनेक समस्यांनी ग्रस्त अशा दिव्यातील ११ वॉर्डावर ते लक्ष केंद्रीत करून तेथे नव्याने पाय रोवू शकतात. तसेच विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही ठाणे शहरात प्रत्येक महापालिका वॉर्डात मनसेला पडलेल्या एक हजार ते पंधराशे मतदारांपर्यंत जाऊन ते त्यांना आपल्यासोबत राखण्याकरिता प्रयत्न करु शकतात. सध्या मनसेतर्फे मतदारांना नाशिकची यात्रा घडवण्यामागे मनसेबरोबर राहिलेल्या याच मतदारांना तेथे नेले जात आहेत. राज यांच्याबाबत आकर्षण असलेल्या युवकांना हेरून त्यांच्यामार्फत सोशल मीडियाद्वारे मनसे नाशिकचा प्रचार करणार आहे. (प्रतिनिधी)अमित ठाकरेही करणार शक्तिप्रदर्शनराज ठाकरे यांचे पुत्र राजकारणात सक्रीय होत असून यंदाच्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ते स्वत: शक्तिप्रदर्शन करणार आहेत. सध्या सोशल मीडियावर ते लक्ष ठेवून आहेत, असे सांगण्यात येते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ठाण्यात आगमन होत असून या आगमनाच्या वेळी जोरदार शक्ति प्रदर्शनाचे नियोजन केले आहे.तब्बल ६०० दुचाकी आणि शंभराच्या आसपास चारचाकी वाहनांच्या भव्य रॅलीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शुक्र वारी सायंकाळी ५.३० वाजता चेकनाका येथे त्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतरकोपरी, कळवा, ठाणे मार्केट, आकाशगंगा, वृंदावन, श्रीरंग सोसायटी आणि वागळे इस्टेट या परिसरातील मनसेच्या निवडणुक कार्यालयांचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर ते सीकेपी महोत्सवालाही भेट देणार आहेत. >ठाकरे यांच्या हस्ते १६ कार्यालयांचे उद्घाटनदि. २० जानेवारी रोजी राज यांच्या हस्ते १६ कार्यालयांचे उदघाटन होणार आहे तर २५ जानेवारी रोजी निवडणूक कार्यालयाच्या उदघाटनासाठी ते ठाण्यात येत आहेत. यावेळी राज भाजपाला टार्गेट करतात की सत्ताधारी शिवसेनेला की दोघांना याबाबत औत्सुक्य आहे. >प्रभागस्तरीय सभांसाठी मनसे शहराध्यक्ष आग्रहीठाण्यात मनसेचा प्रभाव कमी झाल्याने ठाकरे यांच्या मोठ्या सभा घेण्याऐवजी छोट्या सभांवर ठाणे मनसेचा जोर असणार आहे. ठाकरे यांच्या चार सभा व्हाव्यात याकरिता आम्ही आग्रही आहोत. या सभा प्रामुख्याने घोडबंदर रोड, अष्टविनायक चौक, दिवा, वृंदावन या ठिकाणा घेण्यात येतील, असे मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले.