शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

गुणवत्ता नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा उभारणार

By admin | Updated: December 23, 2014 00:03 IST

डांबरीकरण केल्यानंतर काही दिवसातच उखडणारे रस्ते, शासकीय इमारतींच्या नव्या बांधकामाला जाणारे तडे अशा प्रकारच्या

नागपूर : डांबरीकरण केल्यानंतर काही दिवसातच उखडणारे रस्ते, शासकीय इमारतींच्या नव्या बांधकामाला जाणारे तडे अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामांना आता चाप बसणार आहे. महापालिका, नगरपरिषदांमध्ये होणारे रस्ते व विविध विकास कामांवर गुणवत्ता नियंत्रणासाठी एक सक्षम यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. परळी वैजनाथ नगर परिषदेंतर्गत रस्त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याकडे आर.टी. देशमुख यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले. या लक्षवेधीच्या निमित्ताने डॉ. सुनील देशमुख, राजेश टोपे यांच्यासह इतर सदस्यांनीही विकास कामांच्या दर्जावर चिंता व्यक्त करीत गुणवत्तेवर ‘थर्ड पार्टी चेक’राहण्याची गरज व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला. कोणत्या रस्त्याची दुरुस्ती करावी, कुठे नवीन करावा याची काही मानके नाहीत. त्यामुळे एकच काम वारंवार केले जाते व तेच पुन्हा पुन्हा खराब होते. यातून निधीचा अपव्यय होते. अशा कामांसाठी असलेली मानकेही बरीच जुनी झाली आहेत. येत्या काळात दुरुस्ती व नव्या कामांसाठी मानके नव्याने तयार केली जातील. यासाठी एकत्रित धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)