शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी कामांना सुरुवातच नाही

By admin | Updated: May 19, 2016 01:41 IST

अनेक ठिकाणचे नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडर काढण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

पुणे : मे महिना संपण्यास दहा ते बारा दिवस शिल्लक राहिले असतानाही अद्याप शहरातील अनेक ठिकाणचे नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडर काढण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे यंदा बहुतांश ठिकाणच्या सफाईची कामे कागदावरच राहण्याची भीती आहे.यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामे योग्य पद्धतीने पार पाडणे आवश्यक बनले आहे. अन्यथा हे नाले, गटारे तुबूंन शहरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. १२ दिवसांत कामे कशी पूर्ण करणार ?दर वर्षी नाले, गटारे सफाईची पावसाळी कामे ३१ मेपूर्वी पूर्ण केली जातात. आता मे महिना संपण्यास केवळ १२ दिवस उरले आहेत. मात्र, यंदा अनेक क्षेत्रीय कार्यालयांचे नाले व पावसाळी गटारे सफाईच्या कामांचे टेंडरच अद्याप काढण्यात आले नाही. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन वर्कआॅर्डर कधी काढली जाणार आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाल्यांची परिस्थिती खूपच वाईटशहरामध्ये वारजे, शिवाजीनगर, प्रभात रोड, औंध, बावधन, कोथरूड, पाषाण, बाणेर, विश्रांतवाडी, येरवडा, खराडी, हडपसर, कोंढवा, कोरेगाव पार्क, कॅम्प, मार्केटयार्ड, नवी पेठ, अलका चौक, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, धायरी या परिसरातून प्रमुख २७ नाले वाहतात. वर्षभर या नाल्यांमध्ये प्लॅस्टिक, राडारोडा व इतर विविध प्रकारचा कचरा अडकून पडलेला आहे. या नाल्यांची सफाई न झाल्यास पावसाळयामध्ये पाण्याचा मोठा प्रवाह नाल्यातून वाहू लागल्यानंतर पुरस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाल्याच्या परिसरामधील घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांना मोठ्या त्रासास सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)>पालिका आयुक्तांकडूनच दुर्लक्षमहापालिकेच्या कामाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून पावसाळी पूर्व कामांकडे पाहिले जाते. एप्रिल महिन्यात आयुक्तांकडून सर्व विभागप्रमुख व क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाते. त्यानंतर कामे वेळेत व्हावीत, याकरिता आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त, झोनचे उपायुक्त, क्षेत्रीय अधिकारी सातत्याने या कामांवर लक्ष ठेवून असतात. मात्र, यंदा महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून पावसाळी कामांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याची टीका नगरसेवकांकडून केली जात आहे.