शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

धरणक्षेत्राकडे पावसाची पाठ

By admin | Updated: September 19, 2015 03:34 IST

विदर्भासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, तलावांतील

मुंबई : विदर्भासह मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी, तलावांतील पाण्याची पातळी अद्यापही वाढत नसल्याने भविष्यात मुंबईतील २० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे चित्र आहे.पावसाळा वगळता पुढील आठ महिने मुंबईला पुरेसा पाणीपुरवठा करायचा असेल तर १ आॅक्टोबर रोजी सातही तलावांत एकूण १४ लाख दशलक्ष लीटर्स पाणी असणे आवश्यक आहे. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी तलावातील पाण्याने १० लाख दशलक्ष लीटर्सचीही पातळी गाठलेली नाही. १८ सप्टेंबर रोजी सातही तलावांत एकूण ९ लाख ९४ हजार १५२ दशलक्ष लीटर्स पाण्याच्या पातळीची नोंद झाली आहे. हा जलसाठा १२ लाख दशलक्ष लीटर्स झाला तरी मुंबईकरांना भविष्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.परंतु राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असताना मागील २४ तासांत या तलाव क्षेत्रांत मात्र पावसाची नाममात्र नोंद झाली आहे. महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोडक सागर, तानसा, विहार, अपर वैतरणा आणि मध्य वैतरणा क्षेत्रात पावसाची नोंदच झालेली नाही; तर तुलसी तलाव क्षेत्रात २ मिलिमीटर आणि भातसा तलाव क्षेत्रात १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरातही केवळ ढग दाटून येत असून, पावसाने उघडीपच घेतली आहे. गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत १.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असे असले तरीही पुढील ४८ तासांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जनेसह पावसाच्या वारंवार सरी कोसळतील; तर काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (प्रतिनिधी)