शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पावसाच्या सरीसंगे दिवेघाट पार

By admin | Updated: July 2, 2016 04:16 IST

नामघोषाच्या बळावर माऊलींनी आज अवघड दिवेघाटाची वाटचाल पूर्ण करीत सोपानकाकांच्या सासवडमध्ये मुक्कामाला आली.

बाळासाहेब बोचरे,

सासवड- ढगाळ वातावरणात सकाळपासूनची वाटचाल, घाट चालताना निघणाऱ्या घामाच्या धारा आणि वरून कोसळणारा वरुणराजाचा अभिषेक अशा आल्हाददायक पण आव्हानात्मक वातावरणात नामघोषाच्या बळावर माऊलींनी आज अवघड दिवेघाटाची वाटचाल पूर्ण करीत सोपानकाकांच्या सासवडमध्ये मुक्कामाला आली. अवघ्या सोहळ्याला पावसाची चिंता असून भरून आलेले ढग पाहून वारकऱ्यांच्या पायात चालण्याची अधिक ऊर्मी येत होती़ पुणेकरांचा हृद निरोप घेऊन भल्या सकाळी दोन्ही पालख्या बाहेर पडल्या. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा ७ वाजता शिंदे छत्री भैरोबा नाका येथे तर ९़४५ वाजता हडपसर गाडीतळ येथे विसाव्याला आला़ त्यानंतर उरळी देवाची आणि रडकी नाला येथे विश्रांती घेऊन दुपारी २़३० वाजता सोहळा दिव्याचा घाट चढू लागला़ ढगाळ वातावरणात वाटचालीस पोषक वातावरण असले तरी वारकरी घामाघूम झाले होते़ त्यातच आलेल्या शिडकाव्याने दिलासा दिला आणि जल्लोषात वारकऱ्यांनी दिवेघाट पार केला़ घामाघूम झालेल्या वारकऱ्यांना बाबाराजे कोन्हापुरे यांंनी चहापाणी व नाश्त्याची सोय केली होती़ वाट पार करताच झेंडेवाडी येथे पुरंदर तालुक्याच्या सीमेवर पुरंदरवासीयांनी सोहळ््याचे जंगी स्वागत केले. येथे घटिकाभराच्या विश्रांतीनंतर निघालेला सोहळा सायंकाळी सासवड नगरीत दाखल झाला़ उद्या शनिवारी माऊलींचा सासवडमध्ये एक दिवस विसावा असून रविवारी पालखी जेजुरीक डे मार्गस्थ होणार आहे.>...आणि बैलांची शोधाशोधमाऊलींच्या रथासाठी बॅटरी वापरली जात असल्याने गेली तीन वर्षे घाटातून चढण चढण्यासाठी बैलजोडीची गरज भासत नसे. परंतु यंदा तांत्रिक कारणाने बॅटरीचा रथ न आणता जुनाच रथ आणल्याने वडकीपासून पुन्हा बैलजोड्यांची जुळवाजुळव करावी लागली़ नियमित एका बैलजोडीसह आणखी पाच बैलजोड्या रथाला जुंपण्यात आल्या होत्या़ आज सोपान काकांचे सासवडहून प्रस्थानसासवड ही संत ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू संत सोपानकाका यांची नगरी. परंपरेप्रमाणे माऊलींची गळाभेट घेऊन सोपानकाकांची पालखी उद्या (शनिवारी) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे़वारी चुकवू नये असे वाटतेवारी ही वारीच असते. वारी आली की मनाला हुरहूर लागते आणि त्यामध्ये सामील झाल्याशिवाय मन शांत राहत नाही़ सर्वांना मिसळून घेणारा हा सोहळा असल्याने गेली काही वर्षे मी या सोहळ्यात सहभागी होतो, असे वाकी शरीफ ताजुद्दीन बाबा दर्ग्याचे प्रमुख प्रभाकर डहाके (नागपूर) यांनी सांगितले़तुकोबांचा पालखी सोहळा लोणी काळभोरलालोणी काळभोर : पुणेकरांचा दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन तुकोबांची पालखी भल्या सकाळी मार्गस्थ झाली. सोहळ््याला निरोप देण्यासाठी हडपसरच्या सीमेपर्यंत दुतर्फा पुणेकरांनी गर्दी केली होती. सोहळा लोणी-काळभोर येथे मुक्कामी पोहोचला आहे. तेथील श्री विठ्ठल मंदिरांत समाजआरती झाली.