शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसात खेळिया रंगला रे!

By admin | Updated: July 7, 2016 01:45 IST

टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ‘माऊली-माऊली’चा जयघोष, रोखलेला श्वास आणि अंगावर बरसणाऱ्या रिमझिम जलधारा अशा उत्कंठावर्धक व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून माऊलींच्या

- बाळासाहेब बोचरे, तरडगाव (सातारा)

टाळ-मृदंगांचा गजर, मुखी ‘माऊली-माऊली’चा जयघोष, रोखलेला श्वास आणि अंगावर बरसणाऱ्या रिमझिम जलधारा अशा उत्कंठावर्धक व भक्तिमय वातावरणात वैष्णवांच्या मेळ्यातून माऊलींच्या अश्वाने वेगाने धाव घेत चांदोबाचा लिंब येथे वारीतील पहिले उभे रिंगण पूर्ण केले. त्यानंतर सारा आसमंत विठ्ठलनामाच्या जयघोषणात दुमदुमून गेला. हा नयनरम्य सोहळा लाखो भक्तांनी आपल्या डोळ्यांत साठविला.केवळ एक दिवसाचा लोणंदचा मुक्काम संपवून दुपारी १ वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा तरडगावाकडे मार्गस्थ झला. आजच्या दिवसाचे आकर्षण म्हणजे चांदोबाचा लिंब येथे होणारे उभे रिंगण परिसरात पोलिसांनी चांगला बंदोबस्त लावला होता़ आजूबाजूच्या गावातील लोक मिळेल त्या वाहनाने हरीचा खेळ पाहण्यासाठी आले होते़ माऊलींची पालखी येण्यापूर्वीच रिमझिम पावसाने सडा टाकला होता़ त्यावर राजश्री जुन्नरकर तसेच पुण्याच्या समर्थ रंगावलीच्या कलाकारांनी रांगोळ्या काढल्या होत्या़ ३़३० वाजता रिंगणस्थळी अश्व आले़ ४ वाजता माऊलींचा रथ आला़ रामभाऊ चोपदार, उद्धव चोपदार, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार यांनी कौशल्याने रिंगण लावले. प्रचंड रेटारेटी असल्याने रिंगणाला मर्यादा आल्या होत्या़ पखवाज आणि टाळांचा खणखणाट चालू होता़ मुखातून ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड जयघोष सुरू होता़ अशा तल्लीन झालेल्या वातावरणात दोन्ही अश्वांना रिंगणात सोडून देताच अश्वांनी वाऱ्याच्या वेगाने दौडण्यास सुरुवात केली़ त्यावेळी अवघा आसमंत ‘माऊली माऊली’च्या आरोळ्यांनी दुमदुमून गेला होता़ मिनिटभराच्या या खेळाने लाखो नेत्र सुखावले़ त्यानंतर आरती करून बाळासाहेब चोपदारांनी दिंडीकऱ्यांना उडीच्या खेळास आमंत्रण दिले़ हरीच्या खेळाने आनंदित झालेल्या दिंड्या-दिंड्यांमध्ये विविध खेळ सुरू झाले़ नाचत-नाचतच हा सोहळा रात्री तरडगावच्या मुक्कामी गेला़ उद्या पालखी फलटण नगरीत मुक्कामी जाणार आहे़अश्वाच्या धक्क्याने आरफळकर जखमी अपुऱ्या जागेत लावलेल्या रिंगणात अश्वांना दौडण्यास पुरेशी जागा नव्हती़ त्यामुळे दौडताना मालक राजाभाऊ आरफळकर यांना अश्वाचा धक्का लागल्याने ते खाली पडले़ त्यांना तातडीने फलटणच्या रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांची दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले़