शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बारामती, इंदापूरमध्ये दमदार पाऊस

By admin | Updated: June 29, 2016 01:04 IST

बारामती, इंदापूर तालुक्यात मंगळवारी (दि. २८) दमदार पावसाने हजेरी लावली.

बारामती / इंदापूर : बारामती, इंदापूर तालुक्यात मंगळवारी (दि. २८) दमदार पावसाने हजेरी लावली. दुपारी ३ वाजता सुरू झालेला पाऊस सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. आजच्या पावसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. बारामतीच्या जिरायती भागाकडे मात्र अद्यापही पावसाने पाठ फिरविली आहे.जून महिन्याच्या अखेरीस पावसाने केलेली सुरुवात शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. मंगळवारी झालेला पाऊस शेतीसाठी पायदेशीर होता. अनेक ठिकाणी शेतांमध्ये आजच्या पावसाने पाणी साठले होते. अनेक दिवसांची चांगल्या पावसाची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. पावसाची अनुकूल सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांना वेग येणार आहे. बारामती तालुक्यातील काटेवाडी, ढेकळवाडी, लिमटेक, बांदलवाडी भागात पाऊस पडला. बागायती भागातील सोमेश्वरनगरसह जिरायती भागात आजदेखील पावसाने पाठ फिरविली.सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावलेली असताना जिरायती भाग कोरडाच आहे. पावसाने पाठ फिरविल्याने पिण्याच्या पाण्यासह, पिकांच्या लागवडीचा प्रश्न कायम आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याची चिंता सतावत आहे. इंदापूरतालुक्यातील लासुर्णे, अंथुर्णे, सणसर, भवानीनगर, वडापुरी, तावशी, निमसाखर आदी भागांत पावसाने लावलेल्या हजेरीने शेतकरीवर्गातून आनंद व्यक्त होत आहे. इंदापूर शहरात दुपारी साडेचारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. मागील आठवड्यात पडलेल्या पावसाच्या जोरावर काही ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या. मका, बाजरीसह अन्य खरीप पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. (प्रतिनिधी)>काहीसा दिलासा : गुणवडीत घराची भिंत कोसळलीआठ दिवस हुलकावणी दिल्यानंतर, खरी पावसाची गरज होती; परंतु पाऊसच झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. आज झालेल्या पावसामुळे या परिसरातील शेतकरी सुखावला असून, खरीप पिके तरी चांगले निघावीत, अशी प्रार्थना करीत असताना सर्वत्र दिसत आहे. पिंपळी (ता. बारामती) येथे मंगळवारी (दि. २८) दुपारी २ ते ४ च्यादरम्यान पावसाने दमदार हजेरी लावली. गुणवडी, डोर्लेवाडी या परिसरामध्ये पाऊस झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ठिकठिकाणी पाणी साठले होते. या पावसामुळे गुणवडी येथील अक्षय कांबळे या अनाथ विद्यार्थ्याच्या घराची भिंत कोसळली आहे. या विद्यार्थ्याला आई-वडील नाहीत. या घरामध्ये तो त्याच्या बहिणीसोबत राहत आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी या विद्यार्थ्यास मदत करावी, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.