शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करणार

By admin | Updated: May 18, 2016 03:04 IST

रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत उदासीन असलेली पालिका विविध कार्यक्रम राबवून जनजागृती करणार आहे.

सदानंद नाईक,

उल्हासनगर- रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत उदासीन असलेली पालिका विविध कार्यक्रम राबवून जनजागृती करणार आहे. तसेच बांधकाम परवानगी देताना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे केल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. नगरसेवकांना याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे.उल्हासनगरमध्ये रेनवॉटर हॉर्वेस्टिंग पध्दतीकडे दुर्लक्ष केले. शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काँॅग्रेसच्या नगरसेविका मीना सोंडे यांनी स्वत:च्या घरी रेनवॉटर हॉवेस्टिंग करून शहरात नवा आदर्श निर्माण केला आहे. आयुक्त हिरे यांनी सोंडे यांचे अभिनंदन केले आहे. तसेच महासभेत रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली. ‘लोकमत’ राबवित असलेल्या जलमित्र अभियानाचे त्यांनी कौतुक करून शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविणार असल्याची माहिती दिली. शहरात सर्व अटी व शर्तीचे उल्लघंन करून बांधकाम केले जात आहे. पालिकेच्या अहवालानुसार ९५ टक्के बिल्डरांनी इमारतीला पूर्णत्व:चा दाखला घेतला नसल्याचे उघड झाले असून आयुक्तांनी अशा बांधकामांना नोटीसा पाठविल्या आहेत. नोटिशीनंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला नाहीतर अशा बिल्डरांवर एमआरटीपीअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. जेथे बांधकामच नियमानुसार केले जात नाही. तेथे रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बांधकाम परवाना देतानाच बिल्डरांकडून रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत प्रतिज्ञापत्र घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.महापालिका अंदाजपत्रकात रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी तरतूद केली नसली, तरी विशेष तरतूद करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. रेन हार्वेस्टिंगबाबत जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबविणार असून रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविणारे बंगले, इमारती, लहान-मोठी घरे यांनी मालमत्ता करात सूट देण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. नगरसेविका सोंडे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत प्रशिक्षण घेतले असून विनामूल्य मार्गदर्शन करणार असल्याचे त्या म्हणाल्या. ।भूजल पातळी पूर्ववत करण्यासाठी उचलले पाऊलपालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून महिन्यात २०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्या. भूजल पातळी खोल गेली असून काही ठिकाणी ४०० फुटावर पाणी लागत नाही. ही पातळी पूर्ववत होण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग राबविण्याची गरज असल्याचे आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगितले.