शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची सक्ती नको

By admin | Updated: September 21, 2016 04:01 IST

ग्रामीण भागांमध्ये आजच्याघडीला रस्ते, पायवाटा यांची नितांत गरज आहे. नगरसेवकांसाठी असलेला ३१ लाखांचा निधी वापरु द्या.

कल्याण : ग्रामीण भागांमध्ये आजच्याघडीला रस्ते, पायवाटा यांची नितांत गरज आहे. नगरसेवकांसाठी असलेला ३१ लाखांचा निधी वापरु द्या. रेनवॉटर हार्वेस्टींग प्रकल्पाची सक्ती करू नका अशी विनंती स्थायी समितीतील भाजपाचे सदस्य रमाकांत पाटील यांनी सभापती संदीप गायकर यांना केली. यावर रेनवॉटर हार्वेस्टींगसाठी ठेवलेला १० लाखांचा निधी हा त्याच कामासाठी वापरला जाईल. पायवाट, रस्त्यांची कामे उर्वरित २१ लाखांच्या निधीतून करावीत असे स्पष्टीकरण गायकर यांनी केले. शिवसेना सदस्य राजाराम पावशे यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत स्थायी समितीने सुचविलेली कामे का होत नाहीत? असा सवाल उपस्थित केला. यावर बोलताना प्रशासनाचे ग्रामीण भागाकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचा आरोप भाजपाचे सदस्य रमाकांत पाटील यांनी केला. नगरसेवकांसाठी ६-१५-१० असा एकुण ३१ लाखांचा निधी ठेवला असतानाही आजच्या घडीलाही ग्रामीण भागामध्ये रस्ते चांगले नाहीत. तसेच पायवाटांची कामे झालेली नाहीत. या कामांची ग्रामीण भागात नितांंत आवश्यकता असून रेन वॉटर हार्वेस्टींगची सक्ती करू नका त्याच्यासाठी ठेवलेला निधीही अन्य कामांसाठी वापरण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी पाटील यांनी केली होती. नगरसेवक निधीतील १० लाखाचा रेनवॉटर हार्वेस्टींगचा हिस्सा हा गटार, पायवाटा या कामांसाठी वापरू नका अशा सूचना नगरसेवकांना केल्या आहेत. तो निधी कुठेही वापरायचा नाही असे सभापती गायकर यांनी सुनावले. रेनवॉटर हार्वेस्टींग प्रकल्पाची जुन्या बांधकामांमध्ये अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला विलंब का होतोय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा प्रकल्प ज्याठिकाणी राबविणे शक्य नसेल त्या ठिकाणच्या नगरसेवकांनी त्या निधीतून कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारावा अशा सूचना गायकर यांनी केल्या. (प्रतिनिधी)> आराखडा तयारग्रामीण भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले हा आरोप चुकीचा आहे. २७ गावांमधील जी विकासकामे करायची आहेत त्यासंदर्भात आयुक्त इ रवींद्रन यांच्याबरोबर संबंधित गावांमधील नगरसेवकांची बैठक झाली आहे. यात नियोजनबध्द विकासकामांचा आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत गावांमधील २१ रस्त्यांची कामे घेण्यात आली आहेत असे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी बैठकीत सांगितले.