शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या इमारतीत करा पर्जन्य जलसंधारण

By admin | Updated: March 19, 2016 02:21 IST

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळग्रस्त भागांत असलेल्या न्यायालयांत पिण्यासाठीही पाणी मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीची गांभीर्याने

मुंबई : राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळग्रस्त भागांत असलेल्या न्यायालयांत पिण्यासाठीही पाणी मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल उच्च न्यायालयाने राज्यातील प्रत्येक न्यायालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि बोअरवेल उपलब्ध करण्यासाठी धोरण आखण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.मुंबईसह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांतील कनिष्ठ न्यायालयांत पक्षकार व वकिलांकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. याची दखल घेत उच्च न्यायालयाने ‘स्यु-मो’ दाखल करून घेतली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होती. या सुनावणीवेळी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांनी न्यायालयांत वीज आणि पाणीपुरवठ्याबाबत सरकारकडे विचारणा केली. त्यावर सरकारी वकिलांनी भागात नऊ ते दहा तास भारनियमन होत असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणले.‘वीज नाही, तर वॉटर कूलरही काम करू शकत नाहीत. मुळात पाणीच नाही,’ असे खंडपीठाने म्हटले. ‘न्यायालयांच्या नव्या इमारतींंमध्ये रेन हार्वेस्टिंग तर जुन्या इमारतींमध्ये बोअरवेल बसविण्यासाठी आवश्यक ते धोरण आखा,’ असे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले. त्यावर तशी तरतूद असल्याचे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले. ‘अलीकडेच बांधण्यात आलेल्या न्यायालयीन इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले आहे. शक्य झाल्यास जुन्या इमारतींमध्येही रेन हार्वेस्ंिटग सुरू करू. शक्य न झाल्यास बोअरवेल बसविण्याचा विचार सरकार करीत आहे,’ असे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी)

भारनियमन असलेल्या भागातील न्यायालयांना किमान सकाळी ११ ते संध्या. ५ वाजेपर्यंत वीज पुरविण्याचे निर्देश एमईसीबीला देऊ किंवा जनरेटर्स पुरवू, असे आश्वासन सरकारने उच्च न्यायालयाला दिले. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी ७ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे.