शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळापूर्व तयारी अद्याप काठावरच

By admin | Updated: May 10, 2014 20:37 IST

महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी पावसाळापूर्व कामे करण्याचे आदेश दिले. तरीही मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांच्या समन्वया अभावी नदी-नाल्यातील राडारोडा तसाच पडलेला आहे.

- आयुक्तांचे आदेश धाब्यावर; नाल्यात अजूनही राडारोडापुणे : महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी पावसाळापूर्व कामे करण्याचे आदेश दिले. तरीही मुख्य खाते व क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांच्या समन्वया अभावी नदी-नाल्यातील राडारोडा तसाच पडलेला आहे. स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकात दरवर्षी पाणी साचते, त्याठिकाणी उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने पावसाळ्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गतवर्षांप्रमाणे यंदाही महापालिकेत पावसाळापूर्व नियोजनासाठी आयुक्त देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्तांना मुख्य खात्याच्या सहकार्याने तातडीने नदी-नाल्यांची साफसफाई, रस्त्यांचे डांबरीकरण, राडारोडा उचलणे, खड्डे बुजविणे आदी कामे करण्याचे आदेश आठवड्याभरापूर्वी दिले. त्यानुसार स्थायी समितीनेही पावसाळापूर्व कामांसाठी १० कोटीचा निधीला मान्यता दिली आहे. मात्र, महापालिकेतील रस्ते, उद्यान, ड्रेनेज आदी मुख्य खात्यातील अधिकारी व क्षेत्रीय कार्यालयातील अधिका-यांत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यापार्श्वभूमीवर महापौर चंचला कोद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या अधिका-यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कर्णे, सभागृहनेते सुभाष जगताप, गटनेते अशोक हरणावळ, आयुक्त विकास देशमुख, सहआयुक्त सुरेश जगताप, अतिरिक्त आयुक्त विवेक खरवडकर, उपायुक्त मधुकांत गरड, सुनिल केसरी आदी उपस्थित होते. त्यावेळी महापालिकेच्या मुख्य व क्षेत्रीय अधिका-यांनी परस्पराशी समन्वय ठेवून ३१ मेपूर्वी सर्व कामे करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. पावसाळापूर्व कामे...* नदी- ओढ्यातील राडारोडा उचलणे * पावसाळी गटारे व ड्रेनेजलाईनची स्वच्छता * नैसर्गिक प्रवाहातील अडथळे व अतिक्रमण हटविणे* नदीपात्रातील झोपडप˜ीधारकांचे बीएसयुपी प्रकल्पात स्थलांतर* नदीपात्रातील जलपर्णी काढून टाकणे* जुने वृक्ष काढून टाकणे, फाद्या छाटणे* धोकादायक वाडे व इमारतीवर कारवाई करणे.