शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

गावागावांत होणार पावसाची नोंद

By admin | Updated: April 16, 2016 02:30 IST

देशातील तब्बल सहा लाख गावांमध्ये पडणाऱ्या पावसाची नोंद करण्याची योजना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) हाती घेतली आहे. पर्जन्यमानाचे चक्र बदलत असल्याने

- राजानंद मोरे, पुणे

देशातील तब्बल सहा लाख गावांमध्ये पडणाऱ्या पावसाची नोंद करण्याची योजना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) हाती घेतली आहे. पर्जन्यमानाचे चक्र बदलत असल्याने देशाला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर या योजनेच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना पावसाची स्थिती तसेच कृषीविषयक सल्ला देण्याचे नियोजन आहे.सध्या देशात शहर, तालुक्याची ठिकाणे, धरण पाणलोट क्षेत्र किंवा काही महत्त्वाच्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्याआधारे संपूर्ण शहर, तालुक्याची पावसाची सरासरी काढली जाते. आता ‘एक गाव एक पर्जन्यमापक यंत्र’ हे सूत्र निश्चित करण्यात आले असून देशातील तब्बल सहा लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या योजनेविषयी कृषी मौसम विज्ञान विभागाचे उपमहासंचालक डॉ. एन. चटोपाध्याय म्हणाले की, देशाच्या भौगोलिक स्थितीचा विचार केल्यास पावसाच्या प्रमाणात खूप वैविध्य आहे. त्यामुळे एखाद्या मोठ्या परिसरात पडलेल्या पावसाचे अचूक प्रमाण सांगणे तसे शक्य होत नाही. प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्र बसविल्यास कमी अंतरावरील पावसाचे अचूक प्रमाण समजण्यास मदत होणार आहे. त्यानुसार तेथील पावसाच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांना कृषीविषयक विविध मार्गदर्शन करणे शक्य होईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संबंधित गाव किंवा परिसरात एखादी योजना राबविण्याबाबतही मदत होईल. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यमापक बसविण्याचा मान यामुळे भारताला मिळणार आहे.कर्नाटकमधून लवकरच या योजनेची सुरुवात होईल. येत्या पावसाळ्यात तेथील किमान शंभर गावांत यंत्रे बसविली जातील. तसेच सहा महिन्यांत किमान दोन राज्यांमध्ये ही यंत्रे बसविली जातील. गावा-गावांमधून पावसाची माहिती एसएमएसद्वारे एनआयसीकडे संकलित केली जाणार आहे. त्यासाठी संबंधितांना प्रशिक्षणही दिले जाईल. - डॉ. एन. चटोपाध्याय, उपमहासंचालक, कृषी मौसम विज्ञान विभाग