शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: August 17, 2015 00:48 IST

कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने विदर्भासह राज्याच्या काही भागात पडत असलेल्या पावसाचा जोर पुन्हा ओसरला आहे. रविवारी गोंदिया व यवतमाळ

पुणे : कमी दाबाचा पट्टा विरून गेल्याने विदर्भासह राज्याच्या काही भागात पडत असलेल्या पावसाचा जोर पुन्हा ओसरला आहे. रविवारी गोंदिया व यवतमाळ वगळता विदर्भ व मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली. तर मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणीच पाऊस पडला.मागील आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे विदर्भात पाऊस पुन्हा सक्रीय झाला होता. अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पाऊस झाला. पण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा नाहिसा झाला आहे. तसेच आग्नेय उत्तर प्रदेश आणि लगतच्या बिहार व ईशान्य मध्य प्रदेशाच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्रही विरून गेले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागातून पाऊस गायब झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत राज्यात गोंदियात सर्वाधिक १७ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल महाबळेश्वरमध्ये ७ मिमी पाऊस पडला. यवतमाळमध्ये ०.४, नाशिक येथे १, सातारा येथे ०.३, मुंबईत ३ तर रत्नागिरी येथे १ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत कोकणात जव्हार, कणकवली, कुडाळ, चिपळूण, देवगड, गुहागर, सावंतवाडी, संगमेश्वर, पोलादपूर, देवरूख, मंडणगड येथे पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रात इगतपुरी, महाबळेश्वर, एरंडोल, गगनबावडा, ओझरखेडा, पारोळा, पेठ, शाहूवाडी येथे पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात तुरळक ठिकाणे वगळता पाऊस पडला नाही. पुढील आठवडाभर राज्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)