शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा पाऊस, तरतुदींचा दुष्काळ

By admin | Updated: March 19, 2016 02:12 IST

वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात नवीन योजनांचा पाऊस पाडला खरा; पण त्यासाठी अल्प तरतूद केली. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री

मुंबई : वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात नवीन योजनांचा पाऊस पाडला खरा; पण त्यासाठी अल्प तरतूद केली. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमीकरण अभियान’ राबविले जाणार असले तरी त्यासाठीची तरतूद केवळ एक कोटी रुपये आहे. मुनगंटीवार यांनी चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यासाठी ‘नमामि चंद्रभागा’ योजना जाहीर केली. त्यासाठी २० कोटी रुपये खर्च केले जातील. बाळासाहेबांच्या नावे असलेल्या योजनेतून नवीन ग्रामपंचायतींचे बांधकाम, तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करणे, जि.प. प्रभाग बळकट करणे, तसेच ग्रामपंचायतींच्या नियोजनात महिलांच्या संस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी गृहमंत्री (दिवंगत) आर.आर.पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सुधीरभाऊंनी आजच्या अर्थसंकल्पात आर.आर. यांचे स्मारक सांगली जिल्ह्यात उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली. त्या वेळी विरोधी पक्ष सदस्यांनीही बाके वाजवून या घोषणेचे स्वागत केले. थोरांच्या स्मारकांसाठी ५ कोटी महाराष्ट्रातील थोर नेत्यांची स्मारके अन्य राज्यात कोणी उभारणार असेल तर त्यांच्याप्रति कृतज्ञता म्हणून काही निधी देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद केली. ही तरतूद तुटपुंजी असल्याने केल्याने विरोधकांनी खिल्ली उडविली. त्यावर हा निधी मुंबईतील शिवरायांच्या स्मारकासाठी नाही; ते स्मारक भव्यच होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. (प्रतिनिधी)