शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

राज्यासह मुंबईत पावसाची विश्रांती

By admin | Updated: September 26, 2015 03:13 IST

मागील आठवड्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा दिला आहे. शिवाय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे

मुंबई : मागील आठवड्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा दिला आहे. शिवाय मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. परिणामी पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे; परंतु २१ सप्टेंबरपासून राज्यासह मुंबईत पावसाने विश्रांती घेतल्याने जलसंकट दूर होण्यासाठी राज्यासह मुंबईची मदार आता परतीच्या पावसावर आहे.पश्चिम बंगालच्या उपसागरासह गुजरात, बिहार, आसाम, केरळ आणि कर्नाटकावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. परिणामी विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरी पावसाची नोंद झाली होती. २१ सप्टेंबरपर्यंत पडलेल्या पावसाने मात्र कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने विश्रांती घेतली. त्यामुळे राज्यासह मुंबईतही पावसाचा शिडकावा कमी झाला. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून परतलेल्या मान्सूनची सीमा २५ सप्टेंबर रोजीही कायम आहे. वातावरणीय बदलामुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास खोळंबला असून, येत्या आठवड्याभरात परतीचा मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील ४८ तासांत आकाश ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)तलावआजची तलावाचीपातळीखोलीमोडक१६३.०२१६३.१५तानसा१२८.२२१२८.६३विहार७७.२४८०.१२तुळशी१३९.१७१३९.१७अ. वैतरणा ६००.५९६०३.५१भातसा१३५.०८१४२.०७म. वैतरणा २८४.८८२८५