औरंगाबाद: मराठवाड्यात बहुतांश भागात शनिवारी वादळी वारे व विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला. अंगावर वीज पडून बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात दोन ठार, पाच जखमी तसेच उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यात प्रत्येक एक असे एकूण चार जण ठार झाले. वीज कोसळल्याने उस्मानाबाद शहराजवळील एका पोल्टीफॉर्ममधील ५०० कोंबड्या दगावल्या. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील पेट्रोल पंपाचे छत उडाले. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मान्सून येत्या तीन दिवसांत केरळात दाखल होईल, असा अंदाज शनिवारी हवामान विभागाने जाहीर केला आहे. दरवर्षी मान्सून साधारणपणे १ जूनला केरळमध्ये दाखल होतो़ यंदा तो ७ जूनपर्यंत दाखल होईल.
मराठवाड्यात अवकाळी पाऊस
By admin | Updated: June 5, 2016 04:16 IST