शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: August 6, 2016 01:16 IST

शुक्रवारी सकाळपासून शहर व परिसराला पावसाने अक्षरश: झोडपले.

लोणावळा : शुक्रवारी सकाळपासून शहर व परिसराला पावसाने अक्षरश: झोडपले. सुमारे चार तास झालेल्या जोरदार वृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक सोसायट्या, घरांत पाणी शिरून रस्ते जलमय झाले होते. सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान १५५ मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी नऊ ते दुपारी एक या चार तासांत झालेल्या जोरदार पावसाने शहरातील बहुतांश लहान-मोठे रस्ते पाण्याखाली गेले होते. मावळा पुतळा चौकातील नवरत्न चिक्कीसमोरचा रस्ता, निलकमल थिएटरसमोरचा रस्ता, परमार हॉस्पिटल, गुरुद्वारा, निसर्गनगरी, हरनाम हेरिटेज सोसायटी, भांगरवाडी दामोदर कॉलनी, ट्रायिज मॉल, नारायणी धाम, तुंगार्ली गावाकडे जाणारा रस्ता, वलवण, नांगरगाव, सुमित्रा हॉल या बहुतांश सर्व भागातील रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक सोसायट्या व घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिक भयभीत झाले होते. दुपारी एकनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने रस्त्यावरील पाणी काही प्रमाणात कमी झाले होते. पावसाळापूर्व कामात योग्य प्रकारे नालेसफाई न झाल्याने पाण्याचे लोंढे रस्त्यावरून वाहत होते. दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पुन्हा रस्त्यावर पाणी साचले होते. अनेक शाळा दुपारी सोडण्यात आल्या. नगर परिषदेने शनिवारी शाळेला सुटी जाहीर केली आहे.नैसर्गिक नाले अडविल्याने राजमाची गावाचा रस्ता पाण्यातकुणेगाव येथील डेल्ला अ‍ॅडव्हेंचर व कल्पतरू या दोन बड्या बांधकाम व्यावसायकांनी डोंगरावरून वाहणारा नैसर्गिक नाला उंचच्या उंच भिंती घालून अडविल्याने राजमाची गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी तुंबले होते. कुणेगाव ग्रामपंचायतीने ही बाब वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नजरेसमोर आणून दिली होती. मात्र, प्रशासनाने लक्ष न दिल्याने ही स्थिती निर्माण झाली होती. अखेर कुणेगावचे सरपंच रामदास पांडवे व उपसरपंच संजय ढाकोळ यांनी पोकलॅन मशिनने सदर भिंत तोडल्यानंतर पाण्याला मार्ग मोकळा झाला.(वार्ताहर)>नाले तुंबून पाणी रस्त्यावरगणपती मंदिर भैरवनाथनगर येथे पावसाच्या तडाख्याने नाला तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आल्याने लोणावळा-पवनानगर हा राज्य मार्ग जवळपास अर्धा किमी अंतर पाण्याखाली गेला होता. जवळपास तीन फूट पाणी रस्त्यावर साचल्याने काही काळ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता.