शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात पावसाचे ११ बळी

By admin | Updated: June 4, 2017 01:13 IST

राज्यात दोन दिवसांत पावसाचे ११ बळी गेले असून त्यापैकी चौघे मराठवाड्यातील आहेत. नाशिक आणि पश्चिम वऱ्हाडात प्रत्येकी तिघांचा व नंदुरबारला

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक/ नांदेड/ बुलडाणा / नंदुरबार : राज्यात दोन दिवसांत पावसाचे ११ बळी गेले असून त्यापैकी चौघे मराठवाड्यातील आहेत. नाशिक आणि पश्चिम वऱ्हाडात प्रत्येकी तिघांचा व नंदुरबारला एकाचा मृत्यू झाला. शनिवारी नाशिकला पावसाने झोडपून काढले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तेथे ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे तब्बल एक तास विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला़ टोकडे येथे समाधान बहाद्दुरसिंग सुमराव (३०), सुनंदा दिनकर गायकवाड (३२) अशी मृतांची नावे आहेत. इगतपुरीतील रायगडनगरमध्ये विठू कमळू उघडे (२५) याचा वीज पडून मृत्यू झाला.नांदेड जिल्ह्यातील ईकळीमाळ (ता़ नायगाव) येथे शनिवारी दुपारी शेतात काम करीत असताना वीज पडून गंगाराम (२५) आणि शिवाजी गोंविद मृदंगे (२०) या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला़उदगीर (जि. लातूर) तालुक्यातील मोघा शिवारात वीज पडून पांडुरंग एकनाथ काळोजी (६५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ते शेतात नांगरणीचे काम पाहत थांबले होते़ जालना जिल्ह्यात शेतात काम करता असताना अंगावर वीज कोसळून राघो गौणाजी धनवई (६५) हे ठार झाले.वाशिम जिल्ह्यातील भर जहाँगीर येथे वेळूच्या झाडाची कटाई करण्यासाठी आलेल्या विजय गरकळ (१६) व संतोष गरकळ (३०) या मजुरांचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात मशागतीसाठी गेलेल्या सुरेश महादू काळे यांचा (४०) वीज कोसळून मृत्यू झाला.नंदुरबारच्या सैताणे येथे शुक्रवारी अंगावर वीज पडून जामसिंग रामसिंग भिल (६०) यांचा मृत्यू झाला.मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारापुणे : अजूनही केरळमध्येच मुक्काम ठोकून असलेला मॉन्सून येत्या २४ तासांत अरबी समुद्राचा आणखी काही भाग, दक्षिण कर्नाटक, कर्नाटक किनारपट्टी, रायलसिमा आणि तमिळनाडूच्या काही भागात प्रगती करण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे़ येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे़ मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़६ जूनला विदर्भात तुरळक ठिकाणी आणि ७ जूनला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़