शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणात परतणार पाऊस

By admin | Updated: July 7, 2015 01:56 IST

अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दडी मारून असलेला पाऊस बुधवारपासून कोकणात पुन्हा बरसण्यास सुरूवात होईल.

पुणे : अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून दडी मारून असलेला पाऊस बुधवारपासून कोकणात पुन्हा बरसण्यास सुरूवात होईल. पण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयात मात्र १२ जुलैपर्यंत पाऊस पडणार नाही, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कोकणवगळता राज्यात पाऊस परण्याची चिन्हे नसल्याने दुबार पेरणीचे संकट आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.सध्या राज्यात कोठेही मॉन्सून सक्रिय नाही. त्यामुळे गेल्या २४ तासांत राज्यात कोठेही पाऊस झालेला नाही. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडतो. पण सध्या अशी कोणतीही स्थिती नाही. त्यामुळे पूर्ण राज्यातून पाऊस गायब झाला आहे. पण अरबी समुद्रात केरळपासून गुजरातपर्यंत किनारपट्टीच्या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा हळूहळू सक्रिय होत आहे. त्यामुळे बुधवारपासून कोकणात पुन्हा पावसास सुरूवात होईल आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल, असे डॉ. खोले म्हणाल्या....तर, दुबार पेरणीची शक्यता !च्राज्यात ५७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून ८ दिवस पावसाने ओढ दिल्याने पेरण्या थांबल्या आहेत. ४/५ दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीची शक्यता आहे, अशी माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली.च्पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागात खरिपाचा हंगाम धोक्यात आला आहे. सरासरीपेक्षा कमी, ८८ टक्के पाऊस होईल असा नवा अंंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला होता. शेतकऱ्यांनी जमीनीत पुरेशा ओलाव्याची खात्री करुनच पेरण्या कराव्यात, त्यामुळे दुबार पेरणीची वेळ येणार नाही असे कृषी आयुक्तालयाने स्पष्ट के ले होते.च्राज्यात खरिपाचे ऊस वगळता १ कोटी ३० लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ५७ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ४/५ दिवसांत पाऊस न झाल्यास कोणती पीके घ्यायला लागतील त्याचे नियोजन करण्याच्या सूचना विभागीय कृषी संचालकांना दिल्या असल्याचे देशमुख म्हणाले.महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी साधारणत: १५ जुलैनंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता आहे. असे झाले तर राज्याच्या अनेक भागांमध्ये पुन्हा पाऊस पडेल.- डॉ. मेधा खोले, उपमहासंचालिका, भारतीय हवामानशास्त्र विभाग