शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने झोडपले

By admin | Updated: September 6, 2014 01:11 IST

पनवेल, नवी मुंबई परिसराला शुक्रवारी पावसाने झोडपले. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. दोन ठिकाणी वृक्ष कोसळले.

नवी मुंबई/पनवेल : पनवेल, नवी मुंबई परिसराला शुक्रवारी पावसाने झोडपले. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. दोन ठिकाणी वृक्ष कोसळले. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
गणोशोत्सव सुरू झाल्यापासून शहरात पावसानेही जोरदार हजेरी लावली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रतील बेलापूर व नेरूळ परिसरास पावसाने झोडपले. या ठिकाणी अनुक्रमे 114 व 117 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. बेलापूर बस डेपो व अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. गणोशोत्सव मंडळांचीही धावपळ उडाली. काही ठिकाणी मंडपात पाणी येवू लागले होते. नेरूळमधील डी. वाय. पाटील परिसरात व किल्ले गावठाण येथे वृक्ष कोसळला. पावसापासून वाचण्यासाठी नागरिक रेल्वे स्टेशन, बस डेपो परिसरात मोठय़ाप्रमाणात गर्दी करून उभे असल्याचे चित्र दिसत होते. दुसरीकडे वाशी व ऐरोली परिसरात मात्र तुलनेत कमी पाऊस पडला. वाशीत 99. 2 तर ऐरोलीत 19 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
पनवेल परिसरातही सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपार्पयत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. त्याचबरोबर शहरातील बावन बंगला, सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल, हरीओम नगर, टपाल नाका, उरण नाका या ठिकाणी रस्त्यावर एक फुटापेक्षा जास्त पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. इलेव्हेंडेट रोडच्या खाली अमरधाम स्मशानभूमीजवळ सव्र्हिस रोडवर पाणी साचले.  नवीन पनवेल परिसरातील एचडीएफसी सर्कल, बांठिया हायस्कूलजवळ रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. खांदा वसाहतीत शिवाजी चौकात पाणी साचले होते. त्याचबरोबर नालेही दुथडी भरून वाहत होते. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढल्याने गाढी आणि पाताळगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. कळंबोलीत अनेक सेक्टरमध्ये दीड फूट पाणी साचले होते. काही बैठय़ा घरात पाणी शिरल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर सिडकोने पावसाच्या पाण्यासाठी काढलेले चॅनेल  पाणी भरून वाहत होते. मुंबई- पुणो, मुंबई- गोवा, एनएच4बी, पनवेल -सायन त्याचबरोबर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती. पावसाचा जोर पाहता तहसीलदार पवन चांडक यांनी सर्व नायब तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी त्याचबरोबर शासकीय अधिका:यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
 
4बेलापूर व नेरूळमध्ये मुसळधार पाऊस
4शहरात दोन ठिकाणी वृक्ष कोसळले
4सीबीडी बसस्थानक, एपीएमसी व इतर ठिकाणी पाणी साचले
4पनवेलमधील शहरातील बावन बंगला, सहस्त्रबुध्दे हॉस्पिटल, हरीओम नगर, टपाल नाका, उरण नाका या ठिकाणी रस्त्यावर एक फुटापेक्षा जास्त पाणी साचले होते.
4एचडीएफसी सर्कल, बांठिया हायस्कूलजवळ रस्त्यावर पाणी पाणी झाले होते. खांदा वसाहतीत शिवाजी चौकात पाणी साचले 
4गाढी आणि पाताळगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली 
4कळंबोलीत अनेक सेक्टरमध्ये दीड फूट पाणी साचले होते. 
4मुंबई- पुणो, मुंबई- गोवा, एनएच4बी, पनवेल -सायन त्याचबरोबर द्रुतगती महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती.