शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस अजून ढगातच!

By admin | Updated: June 20, 2017 01:27 IST

हवामान खात्याने वर्तविलेले ‘मुसळधारे’चे सर्व अंदाज साफ धुडकावून लावत गेल्या दोन दिवसापासून पावसाने ढगात दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हवामान खात्याने वर्तविलेले ‘मुसळधारे’चे सर्व अंदाज साफ धुडकावून लावत गेल्या दोन दिवसापासून पावसाने ढगात दडी मारल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. आजवरची आकडेवारी पाहिली तर काही ठिकाणी पाऊस तत्वत:च हजेरी लावून गेल्याचे दिसून येते. राज्यात काही ठिकाणी बरसलेल्या पावसाने सरासरी ओलांडली असल्याचे चित्र कागदावर दिसून येत आहे. मात्र, प्रत्यक्षात कोकण, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग वगळता इतरत्र पावसाने पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. आत्तापर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाडा वगळता पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी दिसून येत आहे. काही ठिकाणी सात दिवसांची देखील ओढ दिसून येत आहे. पारंपरिक दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे. पुणे वेधशाळेचे अधिकारी अरविंद श्रीवास्तव म्हणाले, मान्सूनच्या वाटचालीत कधीही सलगता नसते. कधी अनुकूल आणि प्रलिकूल परिस्थिती उद्भवते. त्यावरच त्याची वाटचाल अवलंबून असते. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांची दिशा बदलल्याने प्रतिकूल वातावरण तयार झाले आहे. येत्या दोन दिवसांत या स्थितीत बदल होऊन मान्सून पुन्हा सक्रीय होईल. येत्या दोन ते ३ दिवसांत पाऊस पुन्हा सक्रीय होईल. तर, २५ ते २७ जून दरम्यान संपूर्ण राज्यात चांगला पाऊस होईल, असे हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले. राज्यातील अनेक भागांत पावसाने आठवड्यापेक्षा जास्त ओढ दिली आहे. तेथील पिकांवर काहीसा परिणाम होऊ शकतो, असेही साबळे यांनी स्पष्ट केले.