शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

पावसाची ‘उसंत’ तर मुंबापुरी भक्तीत ‘चिंब’

By admin | Updated: September 5, 2016 01:54 IST

अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.

टीम लोकमत,

मुंबई- अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत आपल्या लाडक्या बाप्पाच्या सेवेत कोणतीच कमतरता राहू नये, यासाठी रविवारच्या तयारीचा अखेरचा दिवस हेरून शहर-उपनगरातील दादर, लालबाग, परळ, घाटकोपर, मशीद, भुलेश्वर अशा सर्वच बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून आली. तर दुसरीकडे पावसाने उसंत घेतल्यामुळे मुंबईकरांच्या भक्तीला उधाण आले होते.गेल्या दोन आठवड्यांपासून मुंबईत गणपतीच्या मिरवणुकांनी वातावरण भक्तीमय झालेले आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी रविवार असल्यामुळे लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी सकाळपासूनच सुरू झाली होती. बाप्पाला आवडणाऱ्या मोदक, लाडूसाठी मिठाईच्या दुकानांत गर्दी झालेली दिसून येत होती. बाप्पाचे दागिने, सजावटीच्या वस्तू घेण्यास अनेक भक्तांनी बाजारात गर्दी केली. फळे, फुले, विद्युत रोशणाई, गुलाल, कापूर, आरास करण्यास विविध रंगातील पडदे, प्रसादासाठी साखरफुटाणे, आंबा मोदक, पेढे आदींच्या विक्रीने आज उच्चांक गाठला. तर पावसानेही उसंत घेतल्याने आज भाविकांच्या उत्साहाला पारावर उरला नाही.>दागिन्यांनी सजणार बाप्पामुंबई : बाप्पाचे आगमन काही तासांवर येऊन ठेपले असताना दागिने आणि अलंकारांनी बाप्पाची ‘श्रीमंती’अधिकच खुलणार आहे. गेल्या ९२ वर्षांपासून बाप्पा दागिने घडविण्याची सेवा करणारे गिरगावातील नाना वेदक यांनी यंदा तब्बल ५ ते ७ किलो सोने आणि ५० किलो चांदीचे अलंकार घडविले आहेत. मुंबई शहर-उपनगरातील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे दागिने गेली अनेक वर्षे नाना घडवित आहेत. त्यात गणेशगल्ली, लालबागचा राजा, फोर्टचा राजा, तेजुकाया, गिरगावचा राजा, चिंतामणी अशा अनेक मंडळांचा समावेश आहे. १७ कारागीर नानांच्या देखरेखीखाली हे अलंकारांचे काम दरवर्षी करतात. अलंकारांमध्ये मुकुट, कर्णफुले, हार, भिकबाळी, हातातील कडे, बाजूबंद, वाळे, आशीर्वादाचा हात, सोंडेचे अलंकार असे विविध अलंकार घडविले जातात. त्यात यंदा बोरीवलीच्या बाप्पासाठी पाच किलोचा मुकुट बनविण्यात आला आहे. हा मुकुट घडविण्यासाठी १५ दिवस लागल्याचे नानांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर राज्याच्या ग्रामीण भागातील २३ मंडळांनीही खास करून अलंकार घडवून घेतल्याचे त्यांनी सांगितले.>‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात रविवारी संध्याकाळी ऐटीत घरगुती गणपती बाप्पा निघाले होते. घरगुती गणपतींच्या आगमानावेळी ढोलताशांचा गजर तर काही ठिकाणी डीजेही सुरू होते. ज्येष्ठांसह तरुण, लहान मुले आगमन मिरवणुकीत सहभागी झाली. रात्री उशिरापर्यंत शहरात गणपती आगमनाची धामधूम सुरू होती. त्यामुळे काही ठिकाणची वाहतूक वळविण्यात आली होती. चिंचपोकळीच्या पुलावर ट्रॅफिकची काही प्रमाणात कोंडी झाली होती. पण गणेशभक्तांच्या उत्साहामुळे या कोंडीतही एक प्रकारचे चैतन्य निर्माण झाले होते. उत्साहात गणेश आगमन झाले असून, मुंबापुरी भक्तीमय रंगात न्हाऊन निघाली आहे. >‘लालबागचा राजा’चे पहाटे ६पासून दर्शनमुंबई : ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येने यंदाही रेकॉर्डब्रेक होण्याची शक्यता आहे. कारण गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधीच हजारो भाविकांनी चरणस्पर्श करण्यास रांग लावली आहे.मंडळाचे पदाधिकारी सुधीर साळवी यांनी दिलेल्या माहितानुसार, अंतर्गत सुरक्षेसाठी रात्री ९ वाजता रांग मंडपाच्या दिशेने सोडण्यात येईल. सकाळी ६ वाजता दर्शनाला सुरुवात होणार होती, मात्र त्याआधीच भाविकांनी रांगेला सुरुवात केली. मंगळवारपासून रांगेला सुरुवात झाल्याने रविवारीच रांग काळेवाडीपर्यंत गेली. सोमवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे ठीक ४ वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळा सुदाम कांबळे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होईल. त्यानंतर वार्षिक अहवालाचे प्रकाशन होईल. दुपारी १ वाजता मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते श्रींपुढील आरती हाईल; तसेच रात्रौ ८.३० वाजता श्रींपुढील आरती होईल. (प्रतिनिधी)>‘टीशर्टधारी’ कार्यकर्त्यांची गर्दीगेल्या काही वर्षांत प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या मंडळाच्या नावाचे आणि लोगोज्चे टीशर्ट्स छापण्याचा ट्रेंड सेट झाला आहे. रविवारी सायंकाळी दादर-लालबाग परिसरात विविध मंडळांच्या उत्याही ‘टीशर्टधारी’ कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. कुणाचा राजा, कुणाचा चिंतामणी तर कुणासाठी महाराजा अशी बिरुदावली मिरवणारे संदेश या कार्यकर्त्यांच्या टीशर्टस्वर दिसून आले.गौराई पूजेच्या खरेदीचीही रेलचेललाडक्या बाप्पासह गौरी पूजेकरिता खरेदीसाठी महिलावर्गानेही बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. गेल्या काही वर्षांपासून मुखवटाधारी गौराईचे स्वरूप पालटले असून, तिचीही मूर्ती आणण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्यामुळे गौराईच्या साजशृंगाराकडे महिलावर्गाचे आवर्जून लक्ष असते. यंदा गौराईसाठी मस्तानी नथ, वैशिष्ट्यपूर्ण साड्या, राणी हार अशा विविध आकर्षक अलंकारांची रेलचेल दिसून येते आहे.